सध्याच्या ऑनलाईन रिचार्जच्या जमान्यात कधी तरी आपल्याकडून चुकून एखाद्या चुकीच्या नंबरवर रिचार्ज होते. अशा वेळी काय करावे ते आपण पाहुयात…!
मागील अनेक दिवसांपासून आपण ऑनलाईन रिचार्ज करत आलो आहोत. पण त्याआधी आपण आपलं रिचार्ज झालं की एखादा दुकानावर जाऊन टॉप अप कार्ड खरेदी करायचो. पण बदलत्या काळानुसार आपण सुद्धा बदलत चाललो आहोत. आज घरबसल्या रिचार्ज करता येते. तुम्ही सहसा रिचार्जसाठी वेगवेगळे ऍप्स वापरत असाल. पण काहीवेळेस आपण घाईघाईत दुसऱ्याच एखाद्या नंबरवर रिचार्ज करतो. परंतु जर रिचार्जची रक्कम लहान असेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु जर मोठी रक्कम असेल तर पैसे वाया गेल्याबद्दल खूप जास्त त्रास होऊ शकतो.
चुकीचा नंबर टाकला तर काय करावे..
जर चुकून घाईघाईत चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाले असेल तर तुम्ही ज्या कंपनीचे सिमकार्ड वापरता. त्यांच्या कस्टमर केअर ला लगेच कॉल करा त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना सर्व माहिती द्या जसे की रिचार्ज कधी केले, कोणत्या कंपनीचा नंबर रिचार्ज झाला, कोणत्या ऍप्सद्वारे रिचार्ज करण्यात आले अशी सर्व माहिती त्यांना द्यावी.
एवढंच नाही तर तुम्ही याशिवाय हा तपशील संबंधित कंपनीला ई-मेल द्वारे पाठवू शकता.
परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही वेळेवर तुमची तक्रार दाखल केली तरच तुमचे पैसे परत मिळतील. एवढंच नाही तर ज्या नंबरवर तुम्ही रिचार्ज केले आहे तो नंबर तुमच्या नंबरशी मिळता -जुळता असायला हवा. म्हणजेच एका किंवा दोन नंबरमुळे रिचार्ज दुसऱ्या नंबरवर झाले असेल तर पैशे परत मिळण्याचे चॅन्सस जास्त असू शकतात. जर संपूर्ण नंबरच वेगळा असेल तर अशा परिस्थितीत कंपनी पैशे देण्यास टाळाटाळ करते कारण बरेच असे लोक कंपनीला जाणीवपूर्वक त्रास देत असतात. त्यामुळे तुमचा नंबर आणि ज्या नंबरवर रिचार्ज झाले आहे तो नंबर मिळता -जुळता असायला हवा