WhatsApp च्या अनेक अश्या काही सोप्या ट्रिक्स आहेत ज्यांची माहिती आपल्याला नसते. तर मग अशाच काही विशेष ट्रिक्स बद्दल जाणून घेऊया. बऱ्याचदा आपल्याला WhatsApp वर एखाद्या व्यक्तीचं स्टेट्स पाहायचं असतं परंतु परंतु आपण त्यांचं ते स्टेटस पाहिला आहे हे त्याला आपल्याला कळू द्यायचं नसतं. तुम्हाला देखील असंच काही करायचं आहे चला तर जाणून घेऊया याचे काही भन्नाट मार्ग.
रीड रीसीट बंद करा (Android/IOS)
WhatsApp अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही वापरकर्त्यांना रीड रिसीट्स बंद करण्याचा मार्ग मिळतो. त्यामुळे आलेले मेसेजेस तुम्ही वाचले आहेत हे कोणालाच समजणार नाही. तसेच ह्या फिचरमुळे जेव्हा तुम्ही कोणाचं WhatsApp स्टेटस बघता तेव्हा तुमचं नाव त्यांच्या विव्ह्जच्या लिस्टमध्ये दिसणार नाही. हे फिचर सुरू करण्यासाठी:
सर्वप्रथम WhatsApp सुरू करा.
*त्यानंतर सेटिंग्समध्ये जा.
*मग प्रायव्हसीवर या ऑप्शन वर टॅप करा.
*त्यानंतर रीड रिसीट्स या ऑप्शनला स्क्रोल करा.
*त्यापुढे असलेला टॉगल ऑन कारून घ्या.
सूचना: हे फिचर सुरु केल्यावर तुमचं स्टेट्स कोणी पाहिलं हे तुम्हाला स्वतः ला देखील दिसणार नाही. तसेच तुम्ही पाठवलेले मेसेजेस समोरच्या व्यक्तीने वाचले आहेत की नाही हे देखली ब्लु टिक द्वारे कळणार नाही.
File Manager ची मदत घ्या (फक्त Androide)
तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर तुम्ही तुमच्या डिवाइसच्या फाईल मॅनेजरमध्ये जाऊन WhatsApp फाईल्स चेक करून घेऊ शकता. ह्यासाठी:
*फाईल मॅनेजर हे ऑप्शन ओपन करा.
*इंटरनल स्टोरेजमध्ये जा आणि WhatsApp या ऑप्शन मध्ये जा.
*त्यानंतर Media/Statuses या वर क्लिक करा.
या ठिकाणी तुम्हाला सर्व व्हॉट्सअॅप स्टेटस दिसून जातील.
टीप : हा फोल्डर तुम्हाला न दिसल्यास फाईल मॅनेजरच्या सेटिंगमधून Show hidden files ऑन करून घ्या. काही लोकांच्या मोबाईल मध्ये इंटरनल स्टोरेज > अँड्रॉइड > मीडिया > com.whatsapp > WhatsApp > Media वर जाऊन स्टेटस तुम्हाला दिसेल.

WhatsApp वेब सीक्रेट मोडमध्ये अॅक्सेस करा
जे लोक पीसी वरती किंवा लॅपटॉप वरती व्हॉट्सअॅप वापरतात ते सीक्रेट टॅबच्या माध्यमातून वेबमध्ये लॉगइन करू शकतात. आणि आणि कोणालाही न कळू देता स्टेटस बघू शकतात.
सर्वप्रथम लॅपटॉप किंवा पीसीवर क्रोम ब्राउजर ओपन करून घ्या आणि एक इन्कॉग्निटो टॅब ओपन करा.
नंतर web.whatsapp.com ओपन करा आणि डिवाइस लिंक करून घ्या.लॉगइन झाल्यावर या स्टेटस आयकॉनवर क्लिक करा आणि स्टेटस लोड होण्या ची वाट बघा.
त्यानंतर वाय-फाय बंद करून घ्या . स्टेटस ऑफलाइन बघा आणि इन्कॉग्निटो हे टॅब बंद करा.
मित्रांनो WhatsApp वर कोणालाही कळू न देता स्टेटस पाहण्याची ही भन्नाट ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा.