WhatsApp Settings : मित्रांनो नमस्कार आजच्या या डिजिटल युगात प्रायव्हसी फार महत्त्वाची झाली आहे कारण सायबर क्राईम चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर WhatsApp च्या या काही सेटिंग ताबडतोब चालू करणे फार महत्त्वाचा झाले आहे.
WhatsApp Privacy Settings: व्हाट्सअप वापरणाऱ्यांचं प्रमाण आजच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे .सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ॲप्स मध्ये आता व्हाट्सअप चा क्रमांक देखील वर लागतो .त्यामुळे या ॲपची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी तेवढीच महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे व्हाट्सअप ची प्रायव्हसी सुधारण्यासाठी ॲप मध्ये अनेक फीचर्स कंपनी पुरवत असते. अलीकडेच कंपनीने व्हाट्सअप चॅट अपडेट देखील सुरू केले आहे ज्यामध्ये कंपनीने वेळोवेळी लोकांना प्रायव्हसी संबंधित वैशिष्ट्ये बद्दल अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे. मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया व्हाट्सअप च्या या चार महत्त्वाच्या सेटिंग बद्दल ज्या तुम्ही लगेच चालू करायला हव्यात.
• 2FA: मित्रांनो तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी WhatsApp 2FA ऑफर करते. ते चालू ठेवण्याचा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही तुमचे खाते दुसऱ्या डिव्हाइस वर उघडतात तेव्हा तुम्हाला WhatsApp तुम्हाला तुम्ही सेट केलेला 6 अंकी पिन विचारेल अशा वेळेस दुसरे कोणीही तुमचे खाते उघडू शकणार नाहीत.
• ॲप लॉक: तुमचं व्हाट्सअप मधील चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी व्हाट्सअप तुम्हाला ॲप लॉक किंवा चॅट लॉक ही सुविधा पुरवते. दोन्ही चालू ठेवल्याने तुमचे खाते अधिक सुरक्षित होते.आणि बाहेरील लोक तुमच्या चॅट किंवा डेटा मध्ये प्रवेश करू शकत नाही.
• Privacy check Up: त्यानंतर मित्रांनो व्हाट्सअप सेटिंग मध्ये तुम्हाला प्रायव्हसी चेक अप नावाचा ऑप्शन दिसेल यामध्ये तुम्हाला तुमची प्रायव्हसी सुधारण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पर्याय दिसतील. तेथून तुम्ही ठरू शकता की तुम्हाला ग्रुपमध्ये कोणाला ऍड करायचा आहे तुमची वैयक्तिक माहिती कोण पाहू शकणार आहे मेसेज टायमर इत्यादी .
तसेच लवकरच तुम्हाला व्हाट्सअप या ॲपमध्ये ईमेल व्हेरिफिकेशन हे फीचर्स देखील लवकरच जोडले जाणार आहे .यानंतर तुम्ही मोबाईल नंबर व्यतिरिक्त आपण ईमेल द्वारे देखील आपले खाते उघडण्यास सक्षम असणार आहोत मात्र यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल व्हाट्सअप वर जोडावा लागणार आहे.
तर मग मित्रांनो तुम्हालाही तुमचं व्हाट्सअप सुरक्षित ठेवायचा आहे ना मग आपण वर सांगितलेल्या चार महत्त्वाच्या सेटिंग लगेच ऑन करा आणि या महत्त्वाच्या सेटिंग बद्दल तुमच्या मित्राला देखील सांगा.