WhatsApp ॲप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांना नवनवीन फीचर्स उपलब्ध करून देत असते वापरकर्त्यांचा ॲप वापरण्याचा अनुभव अधिक चांगला आणि सुकर व्हावा या उद्देशाने हे फीचर्स कंपनी आपल्या युजर्स ना उपलब्ध करून देत असते. त्यातच आता व्हाट्सअप ने त्यांचं चॅनेल्स फीचर्स लॉन्च केला आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया..
मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी भारतात आणि जगभरातील 150 पेशा अधिक देशांमध्ये WhatsApp चॅनेल सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे. इन्स्टंट मेसेजिंग ॲप्स नुसार व्हाट्सअप चॅनेल्स हे एक मार्गी प्रसारण साधन असणार आहे.
मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग म्हणाले आहे की तुम्ही फॉलो करत असलेल्या लोकांकडून आणि संस्थान कडून तुम्हाला अपडेट मिळवण्याचा एक नवीन खाजगी मार्ग . WhatsApp चॅनेल ची तुमची ओळख करून देण्यासाठी मी उत्सुक असणार आहे. मी हे चॅनल बेटा बातम्या आणि अपडेट्स शेअर करण्यासाठी सुरू करत असल्याचं मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितला आहे.
हे चॅनल तुमच्या चॅट पासून वेगळे आहेत आणि आणि तुम्ही कोणाला फॉलो केले हे इतर फॉलोवर्स ना दिसत नाही. हे ॲप ॲडमिन आणि इतर फॉलोवर्स या दोघांच्याही वैयक्तिक माहितीचे संरक्षण देखिल करते.
व्हॉट्सअॅपचं हे फीचर ब्रॉडकास्ट मेसेजचं एक अपडेटेड स्वरूप असून यासाठी ‘अपडेट’ नावाचा एक वेगळा टॅब तुम्हाला देण्यात येणार आहे. याठिकाणी तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांचे स्टेटस आणि तुम्ही फॉलो करत असलेले विविध चॅनल्स बघायला मिळणार आहे.
यावरूनच तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या चॅनल्सना फॉलो करू शकणार आहात. तुम्हाला एखादा आवडणारा स्पोर्ट प्लेअर ,स्पोर्ट टीम, ट्युशन क्लासेस टेक न्यूज सांगणारा चॅनल अशा विविध गोष्टीसाठी तयार करण्यात आलेले विविध चॅनल तुम्ही या ठिकाणी पाहू शकणार आहात. एखाद्या चॅनल तुम्ही फॉलो देखील केलं तरी देखील त्याच्या अन्य फॉलोअर्सना तुमचा नंबर त्या ठिकाणी दिसणार नाही. आणि यात विशेष बाब म्हणजे तुम्ही जगभरातील विविध चॅनल ला फॉलो करू शकणार आहात.
ठेवतील.
WHATSAPP वर चॅनल कसे तयार करावे?
– Whatsaap वेब उघडा आणि चॅनेल आयकॉनवर क्लिक करून चॅनेलवर जा- क्लिक करा > Create channel- continue वर क्लिक करून घ्या आणि ऑनस्क्रीन प्रॉम्प्टद्वारे सुरू ठेवा.- तुमचे चॅनल तयार करणे पूर्ण करण्यासाठी चॅनेलचे नाव टाका. तुम्ही कधीही नाव बदलू शकणार आहात. तसेच तुम्ही डिस्क्रिप्शन आणि आयकॉन टाकून तुमचे चॅनल कस्टमाइज करू शकता किंवा ते तुम्ही नंतरदेखील करू शकता.
– चॅनेलचे डिस्क्रिप्शन लिहा
: तुमच्या फॉलोअर्सना तुमचे चॅनल कशाबद्दल आहे, हे कळण्यास मदत होण्यासाठी तुमच्या चॅनेल विषयी काही शब्द लिहू शकता जे की तुमचा चॅनेल हे कशाबद्दल आहे हे समजण्यास मदत होईल .
– एक चॅनेल आयकॉन टाका
: तुमच्या फोनवरून किंवा वेब वरून एक प्रतिमा जोडा शकता आणी त्यानंतर create channel वर क्लिक करा त्यानंतर तुमचे चॅनल तयार होईल त्यानंतर.