मित्रांनो व्हॉट्सॲप हे त्यांच्या युजर्ससाठी सतत नवीन अपडेट्स घेऊन येत असतं आणि आपण त्या अपडेट्सचा फायदा नक्कीच घेत असतो. जर तुम्ही व्हाट्सअप वापरत असाल तर तुमच्यासाठी येणार आहेत 5 जबरदस्त नवीन फिचर जे तुम्ही वापरायलाच पाहिजे…
1 व्हॉइस स्टेटस
मित्रांनो आपल्याला माहित आहे की व्हाट्सअप मध्ये आपण स्टेटसला व्हिडिओ किंवा फोटो अपलोड करू शकतो परंतु आता व्हाट्सअप मध्ये एक नवीन अपडेट येणार आहे त्याच्या मदतीने तुम्ही व्हाट्सअप स्टेटस ला व्हाईस स्टेटस अपलोड करू शकणार आहात. व्हॉइस स्टेटस या फिचरच्या मदतीने तुम्ही आता स्टेटसला तुमचा व्हॉइस अपलोड करू शकता म्हणजेच आता तुम्ही व्हाट्सअप स्टेटसला व्हॉइस मेसेज देखील अपलोड करू शकता.
2 केप्ट मेसेज
व्हाट्सअप मध्ये नवनवीन पिक्चर ऍड होत असतात काही दिवसापूर्वीच व्हाट्सअप मध्ये एक फिचर आलं होतं ज्याच्या मदतीने तुम्ही समोरच्या व्यक्तीला सेंड केलेला मेसेज डिलीट फॉर एव्हरीवन करू शकता त्यानंतर तो मेसेज समोरच्या व्यक्तीच्या मोबाईल मधून देखील डिलीट केला जातो. मात्र आता व्हाट्सअप या संबंधित एक नवीन अपडेट घेऊन येत आहे, या फिचरच्या मदतीने आता तुम्ही जो मेसेज सिलेक्ट कराल तो मेसेज समोरचा व्यक्ती डिलिट फॉर एव्हरीवन करू शकणार नाही.
3 व्हिव ऍट वन्स
व्हाट्सअप मध्ये व्ह्यू ॲट वन्स हे एक ऑप्शन दिलेल आहे ज्याच्या मदतीने तुम्ही समोरच्या व्यक्तीला टेक्स्ट मेसेज सेंड केला तर समोरची व्यक्ती तो मेसेज फक्त एकाच वेळेस बघू शकत होती त्यानंतर तो मेसेज ऑटोमॅटिकली गायब व्हायचा, मित्रांनो या फिचर च्या मदतीने तुम्ही आता फोटो, व्हिडीओ व्हिव वन्स म्हणून सेंड करू शकता त्यानंतर तुमचा मेसेज आपोआप डिलिट होऊन जाईल.
4 ओरिजिनल कॉलिटी फोटो
मित्रांनो व्हाट्सअप मध्ये फोटो सेंड करत असताना सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे फोटो सेंड केल्यानंतर त्या फोटोची कॉलेटी अगदी कमी होऊन जाते मात्र व्हाट्सअप ने आता त्यासाठी एक मोठी अपडेट आणली आहे.
यामध्ये तुम्ही तुमचे फोटो ओरिजिनल कॉलिटीमध्ये सेंड करू शकणार आहात. म्हणजे आता तुम्हाला फोटोला डॉक्युमेंट करून सेंड करण्याची गरज पडणार नाही.
हे ऑप्शन ऑन करण्यासाठी खलील स्टेपफॉलो करा:
सेटिंग – स्टोरेज and डेटा – येथे Photo Upload Quality वर क्लिक करून येथे Best Quality सिलेक्ट करा.
5 सर्च मेसेज
जर तुम्ही खूप जास्त मॅसेज करत असाल आणि तुम्हाला एखादा कामाचा मॅसेज सापडत नसेल तर हे फिचर तुमच्या खूप जास्त कामात येईल. तुम्ही आता तारखे वाईज मॅसेज सर्च करून वाचू शकणार आहात.
मित्रांनो हे सगळे फिचर तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये व्हाट्सअप वरती दिसतील. तोपर्यंत तुमच्या मित्रांना देखील हा मेसेज सेंड करून ठेवा.
आणि तुमचे wahtaspp वेळोवेळी अपडेट करत रहा, तसे आम्ही तुम्हाला वेळोवेळी अश्याच टेक्निकल अपडेट देत राहू, धन्यवाद.