Vivo Y78t : Vivo ने त्यांचा खास फोन Y78t लाँच केला आहे, ज्यामध्ये 50MP कॅमेरा, 12GB रॅम आणि इतर अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत, चला तर त्याबद्दल जाणून घेऊया सविस्तर अशी माहिती
चायनीज स्मार्टफोन उत्पादक कंपनी Vivo ने Vivo Y78t नावाचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या Vivo फोनमध्ये फुल एचडी प्लस डिस्प्ले, 120 Hz रिफ्रेश रेट सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. या फोनमध्ये 50-MP चा मुख्य रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. Vivo चा नवा स्मार्टफोन इतर मार्केट मध्ये कधी लॉन्च केला जाईल याबद्दल अजून काहीही सांगितले नाही.
Vivo Y78t फिचर्स चे, वैशिष्ट्ये
Vivo Y78t मध्ये या स्मार्टफोनमध्ये 6.64 इंच LCD पॅनल आहे. जे फुल एचडी+ रिझोल्यूशन देते. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे आणि 240Hz पर्यंत टच सॅम्पलिंग आहे. फोनच्या उजव्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
Vivo Y78t या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे आहे. याशिवाय यात २ मेगापिक्सेल बोकेह लेन्स आणि एलईडी फ्लॅश आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हे उपकरण Android 13 OS वर चालते, जे OriginOS 3.0 च्या लेयरने भरलेले आहे.
Vivo Y78t या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 चिपसेट देण्यात आले आहे. UFS 2.2 स्टोरेज आहे. या फोनमध्ये 8 आणि 12 GB रॅम इन्स्टॉल करण्यात आली आहे. 128 GB ते 256 GB पर्यंत स्टोरेज देखील देण्यात आले आहे. Vivo Y78t मध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते तसेच हा फोन ड्युअल सिम, 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.1, GPS, USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅकने सुसज्ज आहे.
काय आहे Vivo Y78t ची किंमत?
Vivo Y78t या स्मार्टफोन च्या 12 GB RAM + 256 GB वेरिएंटच्या किंमती उघड झाल्या आहेत. त्याची किंमत 1,499 युआन (सुमारे 17,019 रुपये) एवढी आहे. तचेच हा स्मार्टफोन 22 ऑक्टोबरपासून तुम्हाला काळा, पांढरा आणि हिरव्या या तीन रंगात तुम्हाला उपलब्ध होईल. हा फोन इतर मार्केटमध्ये कधी सादर केला जाईल याबत अजून Vivo ने काहीच सांगितलेले नाही.
वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.