Vivo ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo Y200 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला . Vivo चा हा नवीन स्मार्टफोन असून तो Vivo Y100 5G नंतर लॉन्च करण्यात आला आहे. Vivo Y200 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल HD+ रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 4800 mAh बॅटरी देण्यात आली आहे जो 44 वॉट फास्ट चार्जिंगसह येतो कंपनीने असा दावा केला आहे की हा फोन फक्त 19 मिनिटांत 50% चार्ज होतो. स्मार्टफोनमध्ये OIS सपोर्टसह 64MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP दुय्यम कॅमेरा देण्यात आला आहे. समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 4 Gen1 प्रोसेसरवर काम करतो.या स्मार्टफोनच्या संरक्षणासाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.
भारतात या डिवाइसची किंमत 21,999 रुपये एवढी आहे आहे. लॉन्च ऑफरमध्ये कंपनी 2,000 रुपयांची झटपट सूट देखील देत आहे. तुमच्याकडे HDFC आणि ICICI चे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असल्यास तुम्ही या सवलतीचा लाभ देखील घेऊ शकता. हा स्मार्टफोन तुम्ही Vivo India च्या वेबसाइट किंवा Flipkart वरून देखील खरेदी करू शकता. Vivo Y200 5G डेझर्ट गोल्ड आणि डेझर्ट ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Vivo Y200 5G आधीच Android 13 सह सुसज्ज असेल. डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 SoC द्वारे 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह समर्थित आहे. फोनमध्ये 8GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देखील आहे. म्हणजे एकूण RAM 16 GB आहे. फोनमध्ये फुल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
Vivo Y200 5G या फोनमध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे, जो OIS सपोर्टसह येतो. 64MP सेन्सर सोबत, 2MP डेप्थ सेन्सर आणि स्मार्ट ऑरा लाइट प्रदान करण्यात आला आहे. Vivo Y200 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. 5G कनेक्टिव्हिटी, 4800mAh बॅटरी, 16MP सेल्फी कॅमेरा, पाणी आणि धूळ यासाठी विशेष IP54 रेटिंग आहे . ओरा लाईट मुळे हा फोन अगदी जबरदस्त असे फोटो कॅप्चर करतो करतो त्यामुळे हा एक चांगला कॅमेरा फोन ठरतो . त्यामुळे हा स्मार्टफोन बजेट रेंज मध्ये एक जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन ठरतो. ज्यात तुम्हाला हवे असलेले सगळे फीचर्स उपब्ध होतात.