Vivo V29 स्मार्टफोन लॉन्च : चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo ने Vivo V29 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Vivo ने Vivo V29 आणि Vivo V29 Pro हे दोन स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला AMOLED डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या दोन्ही फोनमध्ये 4600mAh बॅटरी आहे, जी 80 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.तसेच हँडसेट मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत
स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊया:
Vivo V29 हा स्मार्टफोन 2 प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला 8GB + 128GB मॉडेलची किंमत 32,999 रुपये आहे. तर 12GB+256GB मॉडेलची किंमत 36,999 रुपये एवढी आहे.
तसेच Vivo V29 Pro ची सुरुवातीची किंमत 8GB + 256GB मॉडेलसाठी 39,999 रुपये इतकी आहे तर 12GB+256GB मॉडेलची किंमत 42,999 रुपये इतकी आहे.
Vivo V29 हा स्मार्टफोन हिमालयन ब्लू, मॅजेस्टिक रेड आणि स्पेस ब्लॅक रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर Vivo V29 Pro हिमालयन ब्लू आणि स्पेस ब्लॅक रंगांमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे.
Vivo V29 आणि V29 Pro 5G दोन्ही स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा 120Hz रिफ्रेश दर आहे. फोटोग्राफीसाठी मोबाइलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा बोकेह सेन्सर आहे. सेल्फीसाठी ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.
तुम्ही येथून फोन खरेदी करू शकता
मित्रांनो Vivo V29 Pro चे दोन्ही फोन आज पासून प्री-बुकिंग उपलब्ध झाले आहेत आणि 10 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी येईल. पण Vivo V29 ची विक्री 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे . दोन्ही फोन विवोच्या वेबसाइट, फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल आणि ऑफलाइन स्टोअर्सवर देखील तुम्हाला उपलब्ध असतील.
तसेच HDFC आणि SBI कार्डद्वारे ऑनलाइन खरेदीवर तुम्हाला सूट मिळेल. आणि ऑफलाइन खरेदीवरही सूट दिली जाईल.
तर मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या एक मराठीला फॉलो नक्की करा.