नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये ,Vivo ने काही दिवसांपूर्वीच अनेक स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. नुकताच आणखी एक स्मार्टफोन Vivo T2x 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे. एवढेच नाही तर Vivo T2x 5G या स्मार्टफोन चे फीचर्स देखील खुप प्रभावी आहेत. यामध्ये तुम्हाला चांगली बॅटरीही मिळणार आहे. सर्वात चांगली गोष्ट सांगायची झाली तर त्याची किंमत देखील तुमच्या बजेटमध्ये असणार आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला कोणत्याही स्मार्टफोन स्टोअरमध्ये मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन बद्दलची वैशिष्ट्ये आणि किंमत याबद्दलची सविस्तर अशी माहिती

Vivo T2x 5G स्मार्टफोन फिचर्स
Vivo T2x 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.58 इंच डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2408 × 1080 पिक्सेल आहे. तुम्हाला त्यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंशन 6020 सह शक्तिशाली प्रोसेसर पाहायला मिळतो. एवढंच नाही तर यात G57 GPU सह ग्राफिक्स देखील देण्यात आले आहेत. या फोनचे वजन 184 ग्रॅम आहे आणि आकारमान 164.05 × 75.6 × 8.15 मिमी एवढे आहे. या फोनमध्ये 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.
Vivo T2x 5G स्मार्टफोन बॅटरी आणि इतर वैशिष्ट्ये
या फोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर, तुम्हाला या Vivo T2x 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची शक्तिशाली अशी बॅटरी पाहायला मिळेल. तसेच चार्ज करण्यासाठी तुम्हाला 18W फास्ट चार्जिंग देखील देण्या आलेआहे .कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल-सिम, 5जी, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, ग्लोनास सारखे अनेक फीचर्स यात आहेत. सुरक्षेसाठी, तुम्हाला एक फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात देण्यात आला आहे.
Vivo T2x 5G स्मार्टफोन कॅमेरा
Vivo T2x 5G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला त्यात 50MP प्राथमिक कॅमेरा दिसेल. यामध्ये तुम्हाला 2MP डेप्थ सेन्सर कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
Vivo T2x 5G स्मार्टफोन किंमत
4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 12,999 रुपये ,तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 13,999 रुपये आहे तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज साठी किंमत 15,999 रुपये एवढी आहे
मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.