नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये . या आर्टिकल मध्ये आपण Vivo चा Vivo T2 Pro 5G हा नवीन स्मार्टफोन येत आहे . याच स्मार्टफोन बद्दल आपण या आर्टिकल मध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Vivo ने 22 सप्टेंबर रोजी भारतात त्यांचा नवीनतम 5G स्मार्टफोन लॉन्च करत आहे, ज्याचे नाव Vivo T2 Pro 5G असे आहे. त्याचे लँडिंग पेज फ्लिपकार्टवर देखील लाइव्ह झाले आहे. हा स्मार्टफोन 22 सप्टेंबरला लॉन्च होणार असल्याच स्पष्ट झालं आहे. Vivo चा Vivo T2 Pro 5G हा फोन कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाणार आहे . हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट, अधिकृत स्टोअर्स आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर देखील विकला जाईल. चला तर मंडळी जाणून घेऊया Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन च्या फीचर्स बद्दल विशेष अशी माहिती…
Vivo T2 Pro 5G चे फीचर्स
Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह 3D कर्व डिस्प्ले मिळू शकतो. कर्व डिस्प्ले व्यतिरिक्त, ते खूप स्लिम देखील दिसते. याशिवाय या फोनच्या कडाही कर्व दिसतात. मागील बाजूस कॅमेरा मॉड्यूलमध्ये आर्क लाइट देण्यात आला आहे.
Vivo T2 Pro 5G कॅमेरा
Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा असेल अशी अपेक्षा आहे. दुसरा सेन्सर काय असेल याबद्दल काहीही माहिती अजून समोर आलेली नाही. फोनमध्ये 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB अंतर्गत स्टोरेज वेरिएंटसह MediaTek Dimensity 7200 SoC असू शकते.यात 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4600 mAh बॅटरी असेल. तसेच चार्जिंगसाठी ह्यात सुपरवूक टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते
Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन ची किंमत किती असू शकते:
Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोनच्या किमती बद्दल सांगायचे झाले तर भारतीय मार्केटमध्ये या स्मार्टफोनची किंमत 22 सप्टेंबर रोजी त्याच्या बेस व्हेरिएंटसाठी 23,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध केले जाईल असं सांगितलं जात आहे.