स्पॅम कॉल संदर्भात गुगल कडून मोठी घोषणा करण्यात आली आहे, कंपनीने जाहीर केले आहे की, स्पॅम कॉल ची सूचना देण्यासाठी लवकरच मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर मोबाइल वर स्पॅम कॉल आल्यानंतर गुगल कडून अलर्ट दिला जाईल. गुगल कडून Google Voice मध्ये या फिचर चा समावेश केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये कंपनीकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग केला जाऊ शकतो.
गुगल च्या या नवीन फीचर मुळे मोबाईल यूजर ला स्पॅम कॉल आल्यानंतर रेड सिग्नल किंवा गुगल व्हॉइस द्वारे सांगण्यात येईल की त्यांना स्पॅम कॉल येत आहे. Truecaller या ऍप्लिकेशन मध्ये अलीकडेच अश्या फिचर चा समावेश करण्यात आला आहे. आता गुगल कश्या पद्धतीने त्यांच्या स्पॅम कॉल फिचर ला वैशिष्ट्यपूर्ण बनवते हे पाहावे लागेल.
गुगलने यासंदर्भात गुरुवारी वर्कस्पेस ब्लॉग अपडेट पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली की हे फिचर यूजर ला स्पॅम कॉल आणि फसवणुकीच्या कॉल पासून संरक्षण करण्यात मदत करेल.
गुगल डायलरमध्ये लवकरच या फिचर चा समावेश आपल्याला बघायला मिळू शकतो, ज्यामुळे कदाचित Truecaller या अप्लिकेशन चा वापर करणे कमी होईल.