मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का ज्या अँप्सवर तुम्ही संपूर्ण दिवस घालवून तुमचा वेळ वाया घालवत असता त्याच अँप्सवरून काही लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात. आणि एवढंच नाही तर ते अँप्स तुम्हालासुद्धा महिन्याकाठी लाखो रुपये कमवून देऊ शकतात. हो हे अगदी खरं आहे की तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. तर आम्ही तुमच्यासाठी काही वर्क फ्रॉम होम चे पर्याय घेऊन आलो आहोत त्याबद्दल आपण सविस्तर पाहुयात…
- इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर
मित्रांनो तुम्ही जे इंस्टाग्राम दिवसभर स्क्रॉल करत असता त्यामध्ये तुम्ही काही मुलं-मुली एखाद्या प्रोडक्ट्स किंवा एखाद्या अँपबद्दल सांगताना पाहिलेच असतील तर अशा जाहिरात करणाऱ्यांना इन्फ्लुएंसर असे म्हणतात. मित्रांनो हे इन्फ्लुएंसर एका प्रोडक्टची जाहिरात करण्याचे एक पोस्टमागे 10,000 – 50,000 रुपये इतकं मानधन घेतात. तर यामध्ये जसजसे फॉलोअर्स जास्त असतील तसतसे पोस्टमागे त्यांचे मानधन वाढत असते. इन्स्टा इन्फ्लुएंसर बनण्यासाठी तुम्हाला एक कंन्टेन्ट निवडावा लागेल आणि सुरुवात करावी लागेल. यामध्ये जसजसे तुमचे फॉलोअर्स वाढत जातील तसतसे तुम्हाला इन्फ्लुएंसर बनण्याची संधी मिळेल आणि मग तुम्ही सुद्धा इंस्टाग्रामच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. पण तुमचे यामध्ये किमान 50,000 फॉलोअर्स असावे लागतील.
- युट्युब
मित्रांनो तुम्ही बरेचशे युट्युबर पाहिले असतील ज्यांची महिन्याची कमाई करोडो रुपये आहे. तर तुम्हीसुद्धा युट्युब पार्टटाइम किंवा फुल टाइम करू शकता आणि महिन्याकाठी लाखो रुपये कमवू शकता. यामध्ये तुम्हाला फक्त 1000 सब्सक्राइबर आणि 4000 तास वाचटाईमची गरज असते. हा क्राईटएरिया पूर्ण झाला की तुम्हाला युट्युबकडून पेमेंट मिळण्यास सुरुवात होते.आणि तसेजसे तुमचे व्हीव वाढत जाईल तसतसे तुमचे डॉलर्स वाढत जाईल. यामध्ये तुम्हाला लाखो रुपये मंथली इनकम येऊ शकतो. याबद्दल तुम्हाला सर्व डिटेल माहिती आपल्या टेक मराठी या युट्युब चॅनेलवर मिळून जाईल तेव्हा लगेच आपल्या चॅनेलला भेट द्या.
3.ब्लॉगिंग
इंटरनेट उपलब्ध झाल्यापासून बरेचसे लोक आता ब्लॉगर बनले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही टीव्ही किंवा सोसिअल मीडियाच्या माध्यमातून अक्षय रास्कर यांचं नाव ऐकलंच असेल त्यांना सध्या ब्लॉगिंग किंग म्हणून ओळखलं जात. त्यांची महिन्याची कमाई 30,000-40,000 डॉलर इतकी असते तसेच तुम्हीसुद्धा फक्त लिहून घरबसल्या पैसे कमवू शकता. मित्रांनो याबद्दल तुम्हाला डिटेल व्हिडिओ युट्युबला मिळून जाईल थेथे ब्लॉग बनवण्यापासून ते पैसे मिळण्यापर्यंतचे सर्व माहिती मिळून जाईल.
मित्रांनो माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि आपल्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद..