फ्लिपकार्टने अखेर त्यांच्या सर्वात मोठया बिग बिलियन डेज सेलची तारीख जाहीर केली आहे. आणि या सेल ची विक्री 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आणि 15 ऑक्टोबरला संपणार आहे. फ्लिपकार्टने याला ‘वर्षातील सर्वात मोठी विक्री’ असे म्हटले आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने असेही घोषित केले आहे की खरेदीदारांना ICICI बँक, अॅक्सिस बँक आणि कोटक बँक कार्डांवर 10% ची सूट देखील मिळेल. याशिवाय, त्यांना पेटीएम यूपीआय आणि वॉलेटद्वारे निवडक उत्पादनांवर सूट देखील दिली जाईल.

तसेच ग्राहकांना त्यांच्या जुन्या मोबाईल देखील चांगल्या किंमतीत देवाणघेवाण करून नवीन स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, खरेदीदारांना अनेक स्मार्ट फोनवर चांगली सूट देखील मिळेल. Google Pixel 7 सेलमध्ये 59,999 रुपयांऐवजी 36,499 रुपयांना उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे तुम्ही देखील या सेलमध्ये या सूट चा फायदा घेऊ शकता. तसेच Oppo Reno 10 Pro 5G 35,999 रुपयांना विक्रीसाठी ऑफर केला जाईल. Samsung Galaxy F13 14,999 रुपयांऐवजी 9,199 रुपयांना खरेदी करता येईल. त्यामूळे तूम्ही या सेल चा फायदा घेऊ शकता.
तसेच Poco M5, Redmi Note 12, Infinix Hot 30, Vivo V29e, Moto G32 आणि इतर अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्स देखील बिग बिलियन डेज सेल दरम्यान तुम्हाला डिस्काउंट आणि ऑफर्सवर उपलब्ध होईल.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान अनेक स्मार्टफोन पहिल्यांदाच सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोन्सच्या मध्ये तुम्हाला Pixel 8, Pixel 8 Pro, Vivo V29 सीरीज सारख्या टेलिफोनचा समावेश आहे.
या ठिकाणी मिळणार अधिकची सूट
खरेदीदारांना ICICI बँक, अॅक्सिस बँक आणि कोटक बँक कार्डांवर 10% ची सूट देखील मिळेल. याशिवाय, त्यांना पेटीएम यूपीआय आणि वॉलेटद्वारे निवडक उत्पादनांवर सूट देखील दिली जाईल.