मित्रांनो भारतीय बाजारात फोल्डेबल स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या खूपच कमी आहेत. अशातच किंमत कमी असल्यामुळे टेक्नोचा Tecno Fantom V Fold हा स्मार्टफोन बाकी कंपन्याना टक्कर देणारा ठरू शकतो.
Tecno Fantom V Fold : टेक्नोने भारतात त्यांचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला आहे. हा फोन सॅमसंग, विवो, ओप्पोच्या फोल्डेबल स्मार्टफोनला टक्कर देणार असल्याच बोललं जात आहे. एकीकडे सॅमसंगचे फोल्डेबल स्मार्टफोन खूपच महाग आहे तर दुसरीकडे टेक्नोच्या या स्मार्टफोनची किंमत सॅमसंग पेक्षा अर्धीच आहे. त्यामुळे हा टेक्नोचा फोन युसर्सच्या मनात जागा निर्माण करू शकतो. एवढंच नाही तर सुरक्षित्तेसाठी या स्मार्टफोन सोबत एक फायबर केस मोफत दिल जात आहे. चला तर पाहूया या स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि सर्वकाही…
Tecno Fantom V Fold :
- या फोनमध्ये 7.85 इंचेस ची डिस्प्ले स्क्रीन दिलेली आहे. यामध्ये स्क्रीन कंटेन्ट च्या हिशोबाने आपल्या-आप 10Hz पासून ते 120Hz पर्यंत स्विच केला जातो. त्यासोबतच या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा देण्यात आले आहे.
- या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप डायमेनसिटी 9000+ चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये 12 GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आले आहे.
- यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे त्यासोबतच 13MP चा अल्ट्रावाईड आणि 50MP चा पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
- या स्मार्टफोन मध्ये 5000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. आणि यासोबतच 45w फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
- किंमत
Tecno Fantom V Fold या स्मार्टफोनची किंमत 88,888 इतकी आहे. कंपनी यामध्ये फक्त एकच वेरियंट विकणार आहे. याचा सेल आजपासून लाईव्ह होणार आहे. हा स्मार्टफोन स्पेसिअल डिस्काउंट सोबत 77,777 रुपयामध्ये विकत घेऊ शकता. या पद्धतीने हा भारतातील सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यासोबतच HDB बँक कार्डवर खरेदी केल्यास 5000 रुपयांचा वेगळा डिस्काउंट दिला जाईल. या फोनला ऑनलाईन – ऑफलाईन रिटेल स्टोरला खरेदी करू शकता.
मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या पेजला लाईक करा आणि अशाच इतर टेक्निकल माहितीसाठी फॉलो नक्की करा..
धन्यवाद.