SSC CGL भरती 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी मेगा भरती.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024 (SSC CGL Bharti 2024) साठी 17727 पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेत 20 पदांचा समावेश आहे.
या भरतीत सहाय्यक विभाग अधिकारी, सहाय्यक/सहाय्यक विभाग अधिकारी, आयकर निरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, कार्यकारी सहाय्यक, संशोधन सहाय्यक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक (CBI), उपनिरीक्षक/कनिष्ठ गुप्तचर अधिकारी, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखापरीक्षक, लेखापाल, लेखापाल/कनिष्ठ लेखापाल, पोस्टल सहाय्यक/सॉर्टिंग सहाय्यक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/उच्च श्रेणी लिपिक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, कर सहाय्यक, आणि उपनिरीक्षक (NIA) अशा विविध पदांचा समावेश आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख खाली दिलेलीआहे. अर्ज प्रक्रियेत उमेदवारांनी आपले शैक्षणिक आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
ही भरती प्रक्रिया उमेदवारांना केंद्रीय सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी देत आहे. उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
या भरती बद्दलची संपूर्ण डिटेल माहिती खाली दिलेली आहे :
पदाचे नाव व क्रमांक : ( एकूण जागा 17727 )
1. सहायक विभाग अधिकारी (Assistant Section Officer)
2. सहाय्यक/सहायक विभाग अधिकारी (Assistant/Assistant Section. Officer)
3. आयकर निरीक्षक (Inspector of Income Tax)
4. निरीक्षक (Inspector)
5. सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी (Assistant Enforcement. Officer)
6. उपनिरीक्षक (Sub Inspector)
7. कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant)
8. संशोधन सहाय्यक (Research Assistant)
9. विभागीय लेखापाल (Divisional Accountant)
10. उपनिरीक्षक (CBI) (Sub Inspector (CBI))
11. उपनिरीक्षक/कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Sub Inspector/Junior. Intelligence Officer)
12. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (Junior Statistical Officer)
13. लेखापरीक्षक (Auditor)
14. लेखापाल (Accountant)
15. लेखापाल/कनिष्ठ लेखापाल (Accountant/Junior Accountant)
16. पोस्टल सहाय्यक/सॉर्टिंग सहाय्यक (Postal Assistant/Sorting. Assistant)
17. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/उच्च श्रेणी लिपिक (Senior Secretariat. Assistant/Higher Grade Clerk)
18. वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (Senior Admin Assistant)
19. कर सहाय्यक (Tax Assistant)
20. उपनिरीक्षक (NIA) (Sub Inspector (NIA))
शैक्षणिक पात्रता : SSC CGL Bharti 2024 Education Qualification Details
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (Junior Statistical Officer) : पदवी व 12 वी मध्ये गणित विषयामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित इतर सर्व पदे: कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक.
वयाची अट : SSC CGL Bharti 2024 साठी वेगवेगळ्या पदासाठी वयाची अट ही वेगवेगळी आहे त्याबद्दलची सर्व डिटेल माहिती खाली दिलेली आहे, खाली दिल्याप्रमाणे कोणत्या पदासाठी वयाची अट काय आहे ते दिलेला आहे, लक्षात घ्या खाली फक्त पद क्रमांक दिलेला आहे त्या समोरील पद कोणते आहे ते वरील List मध्ये तुम्ही पाहू शकता.
01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
पद क्र. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11: 18 ते 30 वर्षे
पद क्र.10: 20 ते 30 वर्षे
पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2024 (11:00 PM)
Tier I परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
Tier II परीक्षा: डिसेंबर 2024
Online अर्जाची लिंक : Click Here
जाहिरात PDF : Download