मित्रांनो आपण टीव्ही, फ्रिज आणि आपल्या गरजेतील बऱ्याच वस्तू 10 ते 15 वर्षांनी खरेदी करत असतो परंतु स्मार्टफोन 1 ते 2 वर्षात खरेदी करत असतो काहीजण तर एका वर्षात दोन तीन स्मार्टफोन सुद्धा खरेदी करत असतात. कारण त्यांना माहिती असतं की काहीनाकाही नवीन आलंय. पण मित्रांनो that is not right हे बरोबर नाही. तर मित्रांनो पुढे मी सांगणार आहे की तुम्ही केव्हा फोन खरेदी केला पाहिजे आणि तुम्ही कोणत्या गोष्टीकडे बघितले पाहिजे.
- तुम्ही एका स्मार्टफोनवर काय करता?
सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर काय करता हा प्रश्न स्वतःलाच विचारा? एक पेपर पेन घ्या आणि त्यावरती लिहून काढा. त्यामध्ये तुम्ही फोटो काढता, व्हिडिओ बघता, फोन करता, गेम खेळता. यामध्ये तुम्ही रँक करा म्हणजे तुमच्यासाठी पहिल्या नंबरवर कॅमेरा असेल दुसरं गेमिंग असेल तिसरं स्मार्टफोन डिझाईन असेल. यामध्ये प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात, जर तुम्ही या गोष्टींचा व्यवस्थित विचार केला तर तुम्हाला समजेल की आपल्याला स्मार्टफोन कशासाठी हवाय?
- तुम्ही एक फोन किती दिवस वापरणार आहात?
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा स्मार्टफोन किती दिवस वापरणार आहात. मित्रांनो याबद्दल माझं मत सांगायचं झालं तर तुम्ही एक फोन कमीतकमी दोन वर्ष तरी वापरायला हवा हे फार महत्वाचे आहे. आणि जर तुम्ही यापेक्षाही जास्त वापरायला तयार असाल तर that is exellent. लोक आजकाल का एवढ्या लवकर स्मार्टफोन खरेदी करतात तर याच कारण असं आहे की दररोज होणार लॉंचिंग जसं की आज 5G आलं पुढे ड्युअल सेल्फी कॅमेरा आले नंतर नवीन डिझाईन आली. त्यामुळे नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची सतत इच्छा होत असते. ही स्मार्टफोन इंडस्ट्री अशाच आहेत पण याचा अर्थ असा नाही की नवीन काही आले की लगेच खरेदी केला पाहिजे. माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे खराब झाला किंवा आपल्याला जे काम करायचं आहे ते आता यामध्ये होणारच नाही तेव्हाच नवीन स्मार्टफोन खरेदी करायला हवा.
- तुम्ही फोन कशासाठी वापरता?
मित्रांनो जर तुम्ही दिवसभर फोन वापरत असाल किंवा दिवसभर फोनवर गेमिंग करत असाल, म्हणजे तुमचं काम दिवसभर फोन शिवाय होऊच शकत नसेल तर तुम्ही 5000 – 6000mAh ची बॅटरी असणारा स्मार्टफोन खरेदी करायला हवा त्याच वजन जे आहे ते कमी असायला हवे जेणेकरून तुमच्या हातावर जास्त लोड येणार नाही.
- डिस्प्ले
तर मित्रांनो सगळेच जन ऍम्युलेट डिस्प्लेकडे बघतात परंतु जर तुम्ही सतत उन्हामध्ये मोबाईल पहात असाल किंवा दिवसभर मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत असाल तर ऍम्युलेट डिस्प्ले असलेला स्मार्टफोन तुम्ही नक्कीच घ्यायला हवा. जर तुम्ही फक्त फोन करण्यासाठीच मोबाईलचा वापरत करत असाल तर तुम्हाला ऍम्युलेट डिस्प्लेची काहीही गरज नसते. ऍम्युलेट टेकनॉलॉजी चांगली आहे पण तुम्हाला खरचं त्याची गरज आहे का याकडे तुम्ही बघितले पाहिजे.
5.5G फोन घेऊ का नको?
हो जर तुम्ही हा स्मार्टफोन चार पाच वर्ष वापरणार असाल तर 5G फोन नक्कीच घ्यायला हवा. याच कारण 5G तुमच्या शहरात यायला किती पण वेळ लागू शकतो. जसं की 4G फार आधी आलेलं पण पुण्यात यायला त्याला 2 वर्ष लागले होते. त्यामुळे जर तुम्ही फोन 5 -6 वर्ष वापरणार असाल तर 5G नक्कीच घ्यायला पाहिजे.
आणि मित्रांनो शेवटी जे बजेट तुम्ही डिसाईड करता त्याच बजेटचा फोन तुम्ही घ्यायला हवा. जसं की तुमचं बजेट 15,000 आहे आणि 17,000 मध्ये खूप चांगल मिळतंय दोन हजार गेले तर काय होणार. असं अजिबात करू नका जे बजेट आहे त्यामध्येच फोन खरेदी करा. मित्रांनो तुम्हाला कळलेच असले की तुम्ही स्मार्टफोन कशासाठी घेणार आहात तेवढेच बजेट ठेवा आणि स्मार्टफोन खरेदी करा..