Samsung ने त्यांचा A-Series मध्ये Samsung Galaxy A05s हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन असल्याचं सांगितलं जात आहे, जो मागील महिन्यात Samsung Galaxy A05 सोबत मलेशियामध्ये देखील सादर करण्यात आला होता. हा फोन स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह येतो.
Samsung Galaxy A05s चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A05s या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे आहे. हा स्मार्टफोन Android 13 आधारित One UI 5.1 Core वर चालतो आणि त्याला Android 14 आणि Android 15 साठी अपडेट्स देखील मिळतील. याशिवाय युजरला चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्सही देखील मिळतील. सुरक्षेसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर बाजूला बसवन्यात आला आहे तसेच फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 50MP प्राथमिक कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP खोलीची लेन्स आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 13MP कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोन बॅटरी 5000mAh आहे आणि 25W फास्ट चार्जिंगसाठी देखील सपोर्ट आहे. या फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक आणि डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत LPDDR4X रॅम, 6GB व्हर्च्युअल रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Samsung Galaxy A05s किंमत किती?
Samsung Galaxy A05s ची किंमत 6GB + 128GB व्हेरिएंटसाठी 14,999 रुपये एवढी देण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन सॅमसंग ऑनलाइन स्टोअर आणि देशभरातील रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकतात. ग्राहकांना SBI बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहाराद्वारे 1,000 रुपयांची झटपट सूट देखील Samsung Galaxy A05s या स्मार्टफोनवर मिळू शकते. हा फोन लाइट ग्रीन, लाइट व्हायलेट आणि ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला उपलब्ध करण्यात आला आहे.
मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा