चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी Redmi ने त्यांची नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च केली आहे. या मालिकेत रेडमी नोट 13 5जी, रेडमी नोट 13 प्रो आणि रेडमी नोट 13 प्रो+ या तीन नवीन स्मार्टफोनचा समावेश केला आहे. चला तर मग या तिन्ही स्मार्टफोनबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया
या स्मार्टफोनबद्दल सांगायची झाले तर, या मालिकेच्या प्रो मॉडेलमध्ये 200MP कॅमेरा देण्यात आला आहे, तर व्हॅनिला प्रकारात 108MP कॅमेरा देण्यात आला आहे . Redmi Note 13 मध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.आणि 20 GB पर्यंत RAM, 8GB व्हर्चुअल रॅम देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याची वैशिष्ट्ये आणि किंमती या बद्दल सविस्तर अशी माहिती.
Redmi Note 13 5G मालिका किंमत
Redmi Note 13 5G च्या 6GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 20,999 रुपये एवढी आहे, तर 8GB RAM + 256GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये एवढी आहे आणि 12GB RAM + 256GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये एवढी आहे.हा स्मार्टफोन तुम्हाला गोल्ड, व्हाइट आणि ब्लॅक या तीन कलर पर्यायांमध्ये सादर केला जाऊ शकतो.
Redmi Note 13 Pro 5G या स्मार्टफोनबद्दल सांगायचे झाले तर त्याच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 28,999 रुपये एवढी असू शकते आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 32,999 रुपये एवढी असू शकते.हा स्मार्टफोन तुम्हाला आर्क्टिक व्हाईट, कोरल पर्पल आणि मिडनाईट ब्लॅक या तीन कलर मध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो.
Redmi Note 13 Pro + 5G या स्मार्टफोन च्या 8 GB RAM + 256 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 33,999 रुपये आणि 12 GB RAM + 512 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 37,999 रुपये एवढी असू शकते. हा स्मार्टफोन तुम्हाला फ्यूजन व्हाईट, फ्यूजन पर्पल आणि फ्यूजन ब्लॅक या कलर पर्यायांमध्ये सादर केला जाऊ शकतो.
मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच टेक विषय माहितीसाठी आपल्या एक मराठीला फॉलो नक्की करा