Redmi Note 13R Pro: हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधी त्याची माहिती लीक झाली आहे. या स्मार्टफोन रेंडर, किंमत आणि फीचर्सची माहिती चायना टेलिकॉम वेबसाइटवर पाहण्यात आली असून हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच, हे पंच-होल डिस्प्लेसह ऑफर केले जाऊ शकते. यासोबतच फोनमध्ये पॉवरफुल प्रोसेसर देखील दिला जाऊ शकतो. चला तर या स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया…
काय आहे Redmi Note 13R Pro अपेक्षित किंमत ?
Redmi Note 13R Pro हा स्मार्टफोन 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजसह ऑफर केला जाऊ शकतो ज्याची किंमत CNY 1,999 (अंदाजे 23,000 रुपये) एवढी असू शकते
तसेच हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक, टाइम ब्लू आणि मॉर्निंग लाइट गोल्ड या कलर मध्ये तुम्हाल ऊपलब्ध होऊ शकतो.
Redmi Note 13R Pro चे काय असू शकतात फिचर्स
हा स्मार्टफोन Android 13 वर कार्य करू शकतो असं देखील सांगितल जात आहे. यात तुम्हाला 6.67 इंचाचा डिस्प्ले देखील देण्यात येऊ शकतो. यासोबतच पंच-होल कटआउटही देखिल यात असू शकतो. त्याच्या प्रोसेसरचे सांकेतिक नाव MT6833P आहे. अशा स्थितीत या फोनमध्ये MediaTek Dimension 810 SoC दिला जाऊ शकतो असा अंदाज देखील वर्तवला जात आहे. या स्मार्टफोन मध्ये 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज दिले जाऊ शकतो.
Redmi Note 13R Pro कॅमेरा
या स्मार्टफोन मध्ये रिअर कॅमेरा युनिट असण्याची अपेक्षा आहे. यात तुम्हाला 108 MP प्राथमिक कॅमेरा आणि 2 MP दुय्यम सेन्सर असेल. तिसऱ्या सेन्सरबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. या स्मार्टफोन मध्ये 16 मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाऊ शकतो. यासोबतच फिंगरप्रिंट स्कॅनरही देखील दिले जाणे अपेक्षित आहे. फोनमध्ये NFC, USB Type-C पोर्ट आणि GPS कनेक्टिव्हिटी पर्याय दिले जाऊ शकतात.
Redmi Note 12R Pro 5G च्या डिस्प्ले बद्दल सांगायचे झाल्यास, यात तुम्हाला 6.67 इंच फुल-HD+ (1080×2400) OLED डिस्प्ले मिळू शकतो. हे octa-core Snapdragon 4 Gen 1 SoC वर कार्य करते. यात 12GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 2.2 इनबिल्ट स्टोरेज आहे.
वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा