Redmi 13 C Launch: हा स्मार्टफोन जागतिक बाजारात नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोनमध्ये नायजेरिया मध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि लवकरच तो भारतात देखील लॉन्च होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Xiaomi नाही जागतिक बाजारात त्यांचा रेडमी तेरा सी हा स्मार्टफोन लॉन्च केला असून आठ जीबी रॅम आणि 50 मेगापिक्सल कॅमेरा सह मीडियाटेक हॅलो चिप्स असलेला हा स्मार्टफोन नायजेरिया चा बाजारात आला आहे. आणि लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारातील ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. चला तर मग या स्वस्त स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन किंमत आणि फीचर्स बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया
Redmi 13C चे स्पेसिफिकेशन
Redmi 13C या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.74 इंचाचा एच डी प्लस डिस्प्ले मिळतो. आणि याची स्कीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असून जी 90 Hz रिफ्रेश रेट वर चालते.
हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित असून मीयुआय 14 वर सादर करण्यात आला आहे. प्रोसेसिंग साठी या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक हिलिओ जी 99 चीपसेट मिळतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत चा स्टोरेज मिळतो. तसेच फोनमधील 4 GB वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी ह्याला 12 GB रॅम पर्यंतची पावर देते.
Redmi 13C कॅमेरा
या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50 MP प्रायमरी सेंसर तसेच 2 MP डेप्थ सेंसर आणि 2 MP ची मायक्रो लेस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओग्राफीसाठी 5 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच या स्मार्टफोनमध्ये सिक्युरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देखील तुम्हाला मिळते.
Redmi 13C किंमत
नायजेरियात हा Redmi 13 C स्मार्टफोन दोन व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ज्यात 4 GB व्हेरिएंट ची किंमत NGN 98,100 ( 10,100 रू) एवढी आहे तर 8 GB व्हेरिएंट ची किंमत NGN 108,100 ( 11,100 रु) एवढी आहे.आणि हा स्मार्टफोन Black आणि Clover Green या कलर मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे.