नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती निघालेली आहे त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करा…
• एकुण 236 जागांसाठी ही भरती होत असून यामध्ये खालील 09 वेगवेगळे पदे आहेत…
1. पद – परिविक्षा अधिकारी, गट क
> जागा – 72
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
2. पद – वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक, गट-क
> जागा – 56
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
3. पद – स्वयंपाकी, गट-ड
> जागा – 06
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास
4. पद – लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क
> जागा – 01
> शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
5. पद – वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड
> जागा – 04
> शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण + उंची: 163 सेमी, छातीः न फुगवता 79 सेमी
6. पद – लघुलेखक (निम्नश्रेणी), गट- क
> जागा – 02
> शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + लघुलेखन 100 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
7. पद – कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड
> जागा – 36
> शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + उंची: 5 फुट 4 इंच, छातीः न फुगवता 31 इंच
8. पद – संरक्षण अधिकारी, गट ब
> जागा – 02
> शैक्षणिक पात्रता – समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव
9. पद – संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट क
> जागा – 57
> शैक्षणिक पात्रता – कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी
• वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट असेल)
• नोकरीचे ठिकाण – संपुर्ण महाराष्ट्र
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
03/11/2024 रात्री 23:55 पर्यंत
• ऑनलाईन अर्जाची फी
> खुला प्रवर्ग – 1000 रुपये
> मागास प्रवर्ग – 900 रुपये
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download