नवीन C- सीरीज स्मार्टफोन Realme N53 चायनीज टेक कंपनी Realme लवकरच लॉन्च करणार आहे, त्याच्याशी संबंधित अनेक रिपोर्ट्स समोर आले आहेत. पूर्वी, मॉडेल क्रमांक RMX3760 सह हा स्मार्टफोन प्रमाणित प्लॅटफॉर्मवर दाखवला गेला होता. आणि आता त्याचे रेंडर्स समोर आले आहेत. हा फोन भारत, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या सर्टिफिकेशन (प्रमाणित)साइटवर दिसला आहे आणि हा फोन लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. नवीन रिपोर्टमध्ये या फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.
Realme C53 चे मागील पॅनल आयफोन 14 प्रो मॉडेल्ससारखे दिसते. कारण त्याच्या उजव्या काठावर स्क्वेअर कॅमेरा देण्यात आला आहे. या मॉड्यूलमध्ये दोन कॅमेरा सेन्सर आणि एक LED फ्लॅश देण्यात आला आहे, जे रिंगसारख्या गोलाकार डिझाइनमध्ये दिलेले आहे. याशिवाय Realme आपल्या बजेट डिव्हाइसमध्ये Realme C55 मध्ये Apple iPhone च्या Dynamic Island सारखे Mini Capsule फीचर देखील देत आहे.
- Realme N53 स्पेसिफिकेश
6.74 IPS LCD डिस्प्ले HD + रिझोल्यूशनसह Realme च्या फोनमध्ये पाहायला मिळू शकते आणि ते 90Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट आहे. डिव्हाइसला Unisoc T612 प्रोसेसरसह 6GB LPDDR4x रॅम आणि 6GB व्हर्च्युअल रॅम मिळू शकतो. या डिव्हाइसमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते. 128GB UFS 2.2 स्टोरेज फोनमध्ये डेडिकेटेड microSD कार्ड स्लॉटसह दिले जाऊ शकते.
- Realme N53 कॅमेरा आणि किंमत
Realme N53 मध्ये 128GB UFS 2.2 स्टोरेज मिळू शकते आणि हा फोन 8MP सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 50MP प्रायमरी लेन्ससह 0.3MP क्षमतेची सेकंडरी लेन्स दिली जाईल. ऑथेंटिकेशनसाठी त्याला साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल आणि त्याची जाडी फक्त 7.59 मिमी असेल. सध्यातरी या मोबाईलच्या किंमतीशी संबंधित कोणतीही माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही.
मित्रांनो हा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनची किंमत हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतरच कळेल. परंतु तो पर्यंत आपल्या टेक मराठी पेजला लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर टिप्स, ट्रिक्स, मोबाईल रिव्ह्यू, आणि टेक्निकल माहितीसाठी आपल्या टेक मराठी – Tech Marathi या पेजला नक्की फॉलो करा..
धन्यवाद…