Realme ने भारतात Realme Narzo N53 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. रियलमी च्या या स्मार्टफोन ऑक्टा कोर Unisoc T612 प्रोसेसर देण्यात आलेले आहे. या फोनमध्ये 5000 एमएएच ची बॅटरी आहे जी ३३ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रियलमीच्या नार्झो एन सीरिजचा हा स्मार्टफोन नार्झो एन५३ हा आतापर्यंतचा सर्वात स्लिम फोन असल्याचे म्हटले जात आहे. चला तर आपण येथे रियलमी नार्झो एन 53 ची वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
रियलमी नार्जो एन53 ची कीमत ?
Realme Narzo N53 च्या ४ जीबी + ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ८,९९९ रुपये आहे. तर 6जीबी + 128जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे. एचडीएफसी बँक चेक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून रिअलमी फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १,००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. Realme Narzo N53 ची विक्री २४ मे पासून सुरू होणार आहे. हा फोन रिअलमी ऑनलाइन स्टोअर आणि ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. पहिल्या सेलमध्ये लोअर व्हेरियंटवर 500 रुपये आणि हायर व्हेरियंटवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळणारा आहे. हा स्मार्टफोन Feather Black आणि Feather Gold कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.
रियलमी नार्ज़ो एन53 फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme Narzo N53 मध्ये 6.74 इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ, टच सॅम्पलिंग रेट 180 हर्ट्झ आणि ब्राइटनेस 450 Nits आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा कोर युनिसॉक टी६१२ प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. हा फोन ६ जीबीपर्यंत व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. रियलमीचा हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर आधारित रिअलमी यूआय ४.० वर काम करतो.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, Realme Narzo N53 मध्ये 50MP AI प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. नार्झो एन५३ मध्ये ५,००० एमएएच ची बॅटरी आहे जी ३३ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी केवळ ३० मिनिटांत ० ते ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. सुरक्षेसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेलं आहे.