Realme C67 5G Launch : स्मार्टफोन उत्पादक कंपनी Realme ने नुकताच त्यांचा भारतीय बाजारात Realme C67 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
या स्मार्टफोन मध्ये 50 MP AI कॅमेरा देण्यात आला आहे. एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लॉन्च करताना, कंपनीने असे सांगितले की या स्मार्टफोन मध्ये MediaTek Mimency 6100 Plus 5G चिपसेटसह , 5000 mAh बॅटरी आहे जी 33 वॉट सुपरव्हीओओसी फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे, जी फोन फक्त 29 मिनिटांत 50 टक्के एवढा चार्ज करू शकते.
या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला दोन मागील कॅमेरे आहेत ज्यात 50 MP AI कॅमेरा आणि 2 MP PDAF कॅमेरा आहे. यात 8 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये 120Hz डायनॅमिक अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले देण्यात आला आहे.
कंपनीने या स्मार्टफोन चे दोन मॉडेल लॉन्च केले आहेत .ज्यात 4G RAM आणि 128 GB ROM ची किंमत 13999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे आणि 6 GB RAM आणि 128 GB ROM मॉडेलची किंमत 14999 रुपये एवढी आहे.
Realme C67 5G हा स्मार्टफोन वेबसाइट आणि ऑनलाइन मार्केटप्लेस Flipkart.com वर विकला जाईल. तसेच हा स्मार्टफोन तुम्हाला ऑनलाइन स्टोअरमध्ये देखील उपलब्ध होईल. स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. 12 हजार रुपयांच्या बजेट रेंजमध्ये मित्रांनो हा तुमच्यासाठी एक बेस्ट फोन ठरु शकतो.