Realme C67 5G Smartphone Launch:रियलमी ने नुकताच त्यांचा Realme C67 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. ज्याचे फीचर्स उत्कृष्ट असे आहे . फक्त 12 हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी ची रॅम आणि 50 MP मेगापिक्सल चा कॅमेरा मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया या मोबाईल बद्दल सविस्तर अशी माहिती.
Realme C67 5G Specification
Realme C67 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.72 इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz एवढा आहे .तसेच तुम्हाला यात 680 चा नीटस ब्राईटनेस देखील मिळतो.Realme C67 5G हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित असून तो realme युआय 4.0 वर चालतो.स्मार्टफोनमध्ये ब्रँडनं मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ चिपसेट दिला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली जी५७ एमसी२ जीपीयू जोडण्यात आला आहे. तसेच Realme C67 5G या स्मार्टफोन मध्ये 6 जीबी ची रॅम आणि 128 जीबी चा स्टोरेज देण्यात आला असून त्यात तुम्ही 6 जीबी डायनॅमिक रॅम चा सपोर्ट देखील यात मिळू शकतो.
Realme C67 5G या स्मार्टफोन च्या कॅमेरा बद्दल सांगायचे झाल्यास यात तुम्हाला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा सेटअप आणि 2 मेगापिक्सल चा पोट्रेट कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी यामध्ये 8 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
Realme C67 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33 W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते.
Realme C67 5G Price
Realme C67 5G हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ज्यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज ची किंमत 13 हजार 999 एवढी आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज च्या व्हेरियंट ची किंमत 14,999 एवढी आहे. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला सनी ओएसिस आणि डार्क पर्पल सारखे दोन कलर उपलब्ध आहे.Realme C67 5G या स्मार्टफोन ची विक्री ही रियल मी वेबसाईट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन 20 डिसेंबर पासून सुरू होईल. तसेच 16 डिसेंबरला दुपारी बारा वाजता रियल मी वेबसाईट आणि फ्लिपकार्ट वरती या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल केला जाणार आहे. ज्यात या स्मार्टफोन वरती ग्राहकांना 2000 रुपयाचा लॉन्च ऑफर डिस्काउंट देखील मिळू शकतो. त्यामुळे 12 हजार रुपयांच्या बजेट रेंजमध्ये मित्रांनो हा तुमच्यासाठी एक बेस्ट फोन ठरु शकतो.
मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.