नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये ,जर तुम्ही एक नविन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Realme C53 हा 108 MP कॅमेरा असलेल्या फोन बद्दल आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो सुप्रसिद्ध चीनी ब्रँड Realme ने जुलैमध्ये भारतीय बाजारात त्यांचा नवीन स्मार्टफोन Realme C53 लॉन्च केला आहे. Realme C53 आत्तापर्यंत 4GB + 128GB आणि 6GB + 64GB अशा दोन कॉन्फिगरेशन पर्यायांमध्ये ऑफर केला होता. परंतू आता Realme ने नवीन 6GB + 128GB व्हेरिएंट देखील आता लॉन्च केला आहे. या डिव्हाइसमध्ये अनेक विशेष वैशिष्ट्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहेत, ज्यामध्ये 5000mAh बॅटरी, 108MP कॅमेरा, 90Hz डिस्प्ले आणि UniSoC T612 प्रोसेसर यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
Realme C53 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
Realme C53 या डिव्हाइसमध्ये तुम्हाला 6.74-इंचाचा LCD डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 560 nits पीक ब्राइटनेस आणि 90Hz चा रिफ्रेश दर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मिनी-कॅप्सूल डिस्प्ले फीचर सह येतो, हे फीचर पहिल्यांदा Realme C55 सह सादर करण्यात आले होते. प्रोसेसरबद्दल सांगायच झाल्यास, यात UniSoC T612 प्रोसेसर देण्यात आले आहे, जो 6GB पर्यंत रॅम, 128GB पर्यंत स्टोरेज आणि Mali G57 GPU सह जोडलेला आहे. हे Android 13 वर आधारित Realme UI T Edition वर काम करते. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला तीन रंग पर्याय उपकरणे चॅम्पियन गोल्ड आणि चॅम्पियन ब्लॅक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत .
कॅमेरा आणि बॅटरी
Realme C53 या डिव्हाइसमध्ये तुम्हाला5000mAh बॅटरी युनिट पॅक करते, जे USB Type-C पोर्टवर 18W जलद चार्जिंगसह येतो . या फोन च्या कॅमेऱ्याबद्दल सांगायच झाले तर Realme C53 मध्ये 108MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट शूटर देखील देण्यात आला आहे.
Realme C53 ची किंमत:
नव्याने लॉन्च केलेल्या Realme C53 6GB + 128GB व्हेरिएंटची भारतात किंमत 11,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन उ 20 सप्टेंबर रोजी दुपारी ठीक 12:00 वाजल्यापासून Flipkart आणि Realme Store वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Realme C53 वर ऑफर:
लॉन्च झालेल्या ऑफर अंतर्गत, तुम्हाला या स्मार्टफोन वर ICICI, HDFC आणि SBI डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 1000 रुपयांपर्यंत सूट देखील मिळेल. Realme C53 च्या 4GB + 128GB आणि 6GB + 64GB वेरिएंटची किंमत अनुक्रमे 9,999 रुपये आणि 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.