Paytm Payment Bank Limited (PPBL) ने नुकतेच आपल्या यूजर साठी UPI Lite लॉन्च केले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही छोटे – मोठे व्यवहार पिन न टाकता करू शकता. आणि आता युजर्स ना प्रोत्साहित करण्यासाठी कंपनीने घोषणा केली आहे की Paytm वर UPI लाईट ऍक्टिवेट केल्यानंतर कॅशबॅक दिला जाईल.
UPI LITE ने युजर्सना 200 रुपयांचा इंस्टेन्ट ट्रांजेक्शन झटपट आणि सोप्या पद्धतीने केला जातो. युजर्स यूपीआय लाईटवर एका दिवसात दोन वेळेस 2000 रुपये ऍड करू शकतात. म्हणजेच त्यामधून प्रत्येक दिवशी 4000 रुपयांचा वापर केला जाऊ शकतो. चला तर पाहूया या सर्व्हिसला ऍक्टिववेट करून तुम्ही कसे पैसे कमवू शकता..
Paytm वर UPI Lite ऍक्टिवेट केल्यानंतर कॅशबॅक किती मिळेल?
पेटीएम त्या युजर्स करिता 100 रुपये कॅशबॅक ऑफर करत आहे. जे युजर्स आपल्या पेटीएम UPI Lite ला पहिल्यांदा ऍक्टिवेट करत आहेत. Paytm नवीन नवीन युजर्सना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कॅशबॅक मिळविण्याकरिता खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा..
UPI Lite कसे सेट करावे
सर्वात अगोदर पेटीएम होमपेजवर जा आणि टॉप लेफ्ट कॉर्नर वर प्रोफाइल वरती क्लिक करा.
आता UPI And Payment क्लिक करा आणि other Setting वरती क्लिक करून UPI Lite वरती क्लिक करा.
आता त्या बँक अकाउंटची निवड करा जे अकाउंट तुम्ही UPI LITE करीता वापरणार आहात.
यानंतर एक पेज ओपन होईल ज्यावरती तुम्हाला UPI LITE ऍक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला पैसे करण्यास सांगितले जातील. जेवढी अमाऊंट तुम्हाला ऍड करायची आहे तेवढी एंटर करा.
जेव्हा तुम्ही तुमचा MPIN टाईप कराल आणि त्याला कन्फर्म कराल तेव्हा तुमचा UPI Lite अकाउंट ऍक्टिवेट होऊन जाईल.
- UPI LITE कसे काम करते.
सुरुवातीला तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमधून त्या वॅलेट मध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहे ज्यामध्ये UPI Lite आहे. यानंतर तुम्ही UPI Lite च्या माध्यमातून पैसे पाठवू शकता..
मित्रांनो अश्याच इतर टेक्निकल माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. कारण आपण अश्याच प्रकारच्या टेक्निकल माहिती खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि ही माहिती तुमच्या मित्राला देखील शेअर करा.
धन्यवाद…