स्मार्टफोन उत्पादक कंपनी Oppo ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo A38 भारतात लॉन्च केला आहे. Oppo या कंपनीने हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी UAE मध्ये लॉन्च केला होता . आता तो भारतातील चाहत्यांसाठी देखील सादर करण्यात आला आहे. Oppo ने हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च केला असून कंपनीने हा फोन 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत बाजारात आणले आहे. जर तुम्ही कमी किमतीत चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आता हा एक उत्तम पर्याय असणार आहे.
Oppo A38 हा फोन कमी किमतीत चांगले फीचर्स देतो. डिस्प्ले पॅनलमध्ये किमान बेझल्स आहेत तर फ्रंट कॅमेरा सेटअप वॉटरड्रॉप नॉच शैलीमध्ये देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4G कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आला आहे.
Oppo ने Oppo A38 हा फोन दोन कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जर तुम्हाला तो l विकत घ्यायचे असेल तर तो डिव्हाइस आता प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आहे. Oppo ने हा स्मार्टफोन 12,999 रुपयांना लॉन्च केले आहे. हा स्मार्टफोन 13 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. Oppo ने चमकदार काळ्या आणि चमकदार सोनेरी रंगांमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
Oppo A38 ची वैशिष्ट्ये काय आहे?
Oppo A38 मध्ये ग्राहकांना 6.56 इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 90Hz इतका आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आउट ऑफ द बॉक्सवर चालतो जो कलर ओएस 13.1 वर आधारित आहे.
या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना MediaTek Helio G85 प्रोसेसर मिळेल. कंपनीने याला 4GB रॅम आणि 128GB सिंगल वेरिएंटसह लॉन्च केले आहे.
कंपनीने यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 50MP आहे तर सेल्फीसाठी यात 5 Mp चा कॅमेरा आहे. स्मार्टफोनला उर्जा देण्यासाठी, 5000mAh बॅटरी दिली गेली आहे जी 33W फास्ट चार्जिंगसह चार्ज केली जाते.