वन प्लस ने त्यांचा नवीन स्मार्टफोन वन प्लस 11R सोलर रेड ऑडिशन लॉन्च केला आहे. कंपनीच्या लेटेस्ट वन प्लस 11R 5G सोलर रेड ची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात 18 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.
One plus 11R स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर्स
वन प्लस 11R सोलर रेड ऑडिशन ची किंमत 45,999 रुपये एवढी आहे. हा वन प्लस चा फोन तुम्हाला इन ,वन प्लस स्टोअर ॲप, वन प्लस एक्सपिरीयन्स स्टोअर आणि ॲमेझॉन इनवर उपलब्ध असणार आहे. 7 ऑक्टोबर 2023 ला अर्ली एक्सेसच्या भागाच्या रूपात सोलर रेड ऑडिशन खरेदी केल्यावर ग्राहकांना एक हजार रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट देखील या ठिकाणी दिला जाणार आहे. यासोबतच एक मोफत वन प्लस बड्स Z2 देखील मिळू शकतो.
One plus 11R स्मार्टफोनची फीचर्स
तसेच One plus 11R सोलर एडिशनच्या फीचर्स विषयी सांगायचं झाल्यास यात तुम्हाला 6.74 इंचाचा डिस्प्ले मिळतो . आणि तो. 2772×1249 पिक्सेल रिझोल्युशन सह येतो. हे डायनॅमिक रिफ्रेश रेट सह 140Hz पर्यंत ऍडजस्ट देखील होते . फोनची डिझाईन देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आली आहे. आणि या फोनच्या डिझाईनमुळे तो अत्यंत लोकप्रिय देखील झाला आहे.
हा डिवाइस शक्तिशाली अशा ऑक्टो- कोर स्नॅपड्रॅगन 8+ गेन 14nm मोबाईल प्लॅटफॉर्म द्वारे समर्पित आहे .या फोन मध्ये तुम्हाला 18GB रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेज असणार आहे.
हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 सह Oxygen OS 13 वर काम करतो. कंपनीचे असे म्हणणे आहे की फोनला चार वर्षासाठी ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट्स आणि पाच वर्षासाठी सुरक्षा अपडेट मिळत राहतील. आणि याची हीच एक महत्त्वाची बाजू समजली जाते.
One Plus 11R कॅमेरा
One plus 11R सोलर एडिशनच्या मागील बाजूस तुम्हाला 50 MP चा प्रायमरी शूटर कॅमेरा आणि 120 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 8 MP अल्ट्रा वाईल्ड लेंस तसेच 2 MP चा मॅक्रो लेन्स समाविष्ट असणार आहे .यात 16 मेगा पिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा असणार आहे. तसेच फोन 5000 mAH ची पावरफूल बॅटरी असणार आहे आणि तो सुपरफास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करणार आहे.
मित्रांनो वरील माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.