Multiple WhatsApp Aacounts On Same Device : कसे वापरायचे हे आता आज आपण जाणून घेणार आहोत .आता सेटिंग मध्ये जाऊन एकापेक्षा जास्त नंबरचा व्हाट्सअप अकाउंट वापरता येणार आहे. तशा प्रकारची घोषणा देखील आता मार्क झुकेरबर्क यांनी केली आहे केली.
मित्रांनो तुमच्याकडे एकापेक्षा जास्त असे WhatsApp अकाउंट देखील असतील ते तुम्ही तुमचा वेगवेगळ्या कामासाठी तयार केलेले असतील आणि व्हाट्सअप मध्ये लॉगिन करण्यासाठी तुम्हाला पर्सनल अकाउंट मधून लॉग आऊट कराव लागत असेल .आणि तसं करून तुम्ही थकला असाल? तर मग आता थांबा तुमच्यासाठी एक चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे . लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आता तुमची समस्या सोडणार आहे आणि एकाच Device वर तुम्ही आता अनेक whatsapp अकाउंट वापरू शकणार आहात.
तुम्हाला लवकरच हे फीचर्स उपलब्ध होणार असल्याची माहिती व्हाट्सअप ची कंपनी मेटाने दिली आहे. सोशल मीडिया वरून ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी मार्क झुकेरबर्ग यांनी दिली आहे . व्हाट्सअप वर लवकरच आता युजर्सना अनेक अकाउंट मध्ये स्वीच करता देखील येणार आहे.
मित्रांनो मात्र सध्या व्हाट्सअप युजर्स ना एक तर अतिरिक्त फोन किंवा टॅबलेट सोबत ठेवावा लागतो किंवा सतत एका अकाउंट मधून लॉग आऊट करून दुसऱ्यात लॉगिन व्हावं लागतं आता मात्र या नवीन फीचर्स मुळे युजर्स सहज अकाउंट मध्ये स्विच करू शकणार आहात. ड्युअल व्हाट्सअप अकाउंट फीचर्स मुळे वेगवेगळ्या अकाउंटवर संवाद साधन देखील अगदी सोपं होणार आहे.
यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत
तुम्हाला Dual Watsapp Aacount फीचर्स वापरण्यासाठी तुमच्याकडे दुसरा नंबर असणं आवश्यक आहे .त्यामुळे तुमच्या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट देखील असावा किंवा दुसऱ्या मोबाईल मध्ये सिम टाकलेलं असावं तरच तुम्हाला डीव्हॉईस वर दोन अकाउंट वापरता येणार आहे.
तुम्हाला दुसरा नंबर हा वन टाइम पासवर्ड मिळवण्यासाठी आवश्यक असणार आहे स.ध्या व्हाट्सअप अकाउंट ॲक्सेस करण्यासाठी एसएमएसच्या माध्यमातून एक पासकोड पाठवला जातो. चला तर मग आता मल्टिपल व्हाट्सअप अकाउंट एकाच डीव्हॉईस वर कसे वापरायचे त्याची पद्धत कशी आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
1] यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर व्हाट्सअप अपडेट करून घ्यावा लागणार आहे त्यासाठी लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करावा लागणार
2]त्यानंतर ॲप ओपन करून डावीकडे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि सेटिंग मेनू ओपन करा
3]या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावापुढे एक एरो दिसेल
4]तिथे जाऊन अॅड अकाउंट वर क्लिक
5]त्यानंतर आता तुमचा दुसरा फोन नंबर टाका आणि एसएमएस कॉलवरून पाठवलेला कोड टाकून व्हेरिफाय करून घ्या
6]आता वेरिफिकेशन झाल्यावर तुम्ही तुमच्या नावासमोर असलेल्या एरोवर टॅप करून दोन अकाउंट मध्ये स्विच करू शकणार आहात.
अशा पद्धतीने तुम्ही एकाच whatsapp मध्ये दोन नंबर वापरू शकणार आहात. मित्रांनो ही होती एकाच whatsapp अकाउंट मध्ये दोन नंबर वापरायची अगदी सोपी आणि नववी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की.