Maharashtra Assembly Budget 2024-2025: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे. महिलांना केंद्र स्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरु केली. महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्य यासाठीच्या योजना राबवली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे.
कोणत्या महिलांना लाभ मिळणार?
– आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील.
– 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
– ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलेच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जाणार.
सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:-
1) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
2) लाभार्थ्याचे आधार कार्ड
3) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/ महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
4) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५0 लाखापर्यत असणे अनिवार्य
5) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
6) पासपोर्ट आकाराचा फोटो.
7) रेरानकार्ड
8) सदर योजनेच्या अटी शार्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
योजनेचे स्वरुप :- पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.1,500/-
इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे
रु.1,500/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेला देण्यात येईल.
योजनेचे लाभार्थी :- महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वषण वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नियम आता मुलींनाही मिळणार दीड हजार रुपये महिना. : बघा
योजनेच्या लाभाथ्यांची पात्रता:
(9) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवयक आहे,
(२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
(३) किमान वयाची २१ वर्षेपूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यत.
(४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवइ्यक आहे.
5) लाभार्थी कुटुबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
अपात्रता :-
१) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे
(२) ज्याच्या कुटुबातील सदस्य आयकरदाता आहे
(3) ज्यांच्या कुडुंबातील सदस्य नियमित/ कायम कर्मचारी। कंत्ाटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
(४) सदर लाभार्थी महिलेने रासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.9,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
(5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदारा/आमदार आहे
Online अर्ज 1 जुलै पासून सुरू होणार आहे, अर्ज कसा भरायचा याची माहिती आपल्या Instagram पेज वर दिली जाईल.
(६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड,/ कॉर्पोरेरन/ बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्षा/ संचालक/ सदस्य आहेत,
(७) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे
(8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅकटर वगळलून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवरयकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शजासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.