Motorola ने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी Motorola Edge 40 लॉन्च केला आहे. कंपनीने सध्या हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी फक्त एकाच रॅम आणि स्टोरेज पर्यायामध्ये लॉन्च केला आहे. मोटोरोला एज 40 ची भारतात किंमत किती आहे आणि या हँडसेटमध्ये तुम्हाला कोणते विशेष फीचर्स मिळतील? चला जाणून घेऊया.
मोटोरोला एज 40 ची भारतात किंमत
मोटोरोला ब्रँडच्या या नवीन फोनचे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इनबिल्ट स्टोरेज असलेले व्हेरिएंट ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आले आहे. या वेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे आणि हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वरून खरेदी केला जाऊ शकतो. या हँडसेटसाठी प्री-ऑर्डर बुकिंग सुरू झाली असून या Smartphone विक्री 30 मे पासून सुरू होणार आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे, या पर्यायाअंतर्गत, 5,000 रुपये प्रति महिना ईएमआयची कोणतीही व्याज नसण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. याशिवाय जुना फोन दिल्यावर 2,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही आहे.
Motorola Edge 40 Camera:
Motorola Edge 40 लादोन कॅमेरा सेन्सर दिलेले आहे. 50-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरसह 13-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Motorola Edge 40 Battery & Charging:
Motorola च्या या नवीन फोनमध्ये 4400 mAh बॅटरी आहे जी 68 W TurboPower वायर्ड चार्जिंग आणि 15 W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सेन्सर आहे.
Motorola Edge 40 मध्ये फुल HD+ रिझोल्यूशनसह 6.65-इंच OLED डिस्प्ले आहे.
यात 20:9 आस्पेक्ट रेशो डिस्प्ले पॅनल आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह 396 PPI ची पिक्सेल घनता आहे.
मोबाइलमध्ये सेल्फी कॅमेरासह मध्यभागी पंच-होल कटआउट आहे.
Motorola Edge 40 Performance:
Motorola ने Motorola Edge 40 मध्ये MediaTek Dimensity 8020 SoC हे प्रोसेसर दिले आहे, जे एक 5G-सक्षम चिपसेट आहे. स्मार्टफोनमध्ये 8GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे त्यामुळे हा स्मार्टफोन पॉवरफुल परफॉर्मन्स नक्कीच देईल.