राज्यात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी या योजनेअंतर्गत आता एक लाख एक हजार रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे नेमकी काय आहे ही लेक लाडकी योजना, ही योजना कधीपासून सुरू होणार, आणि या योजनेसाठी चा अर्ज कुठे आणि कसा करायचा, जाणून घेऊया या योजनेसंबंधीची सविस्तर अशी माहिती…..
Lek Ladki Yojna: मित्रांनो नमस्कार आजची आपली ही माहिती एक विषय नसली तरी ती एक महत्वपूर्ण अशी माहिती आहे त्यामुळे याविषयी आपण आज आपल्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अशी ती कोणती माहिती आहे .मी बोलतो आहे लेक लाडकी या योजनेविषयी . महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.
काय आहे लेक लाडकी योजना?
लेक लाडकी या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलीचा जन्म झाल्यास पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर 7000 रुपये अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये तर अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर 75 हजार रुपये अशा रीतीने त्या मुलीच एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणार आहे .
या योजनेचा लाभ कोणाला भेटणार?
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयापेक्षा कमी असणार आहे त्या कुटुंबात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या कुटुंबात पहिल्यांदाच जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्या दोन्ही मुलींना स्वतंत्रपणे योजनेचा लाभ मिळेल .मात्र त्यानंतर सदर जोडप्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे .काही जोडप्यांना अगोदर एक अपत्य असते मात्र ते जेव्हा अपत्य प्राप्तीची दुसरी संधी घेतात तेव्हा त्यांना जुळी मुले झाल्यास अशा प्रकरणात जर एक मुलगी जन्माला आली तर तिला आणि जर दोन्ही मुली जन्माला आल्या तर दोघींनाही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजना कधीपासून लागू होणार?
महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेविषयी माहिती देताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की लेक लाडकी योजनेसाठी अर्ज आणि प्रस्ताव तयार करण्यास सूचना आम्ही जिल्हास्तरावर दिलेले आहेत विधिमंडळाचा अधिवेशन संपल्यानंतर योजनेचा लाभ द्यायला सुरुवात होणार आहे.
तसेच पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही या योजनेसाठी 125 कोटी रुपयांची मागणी देखील केली आहे हा निधी एकदा प्राप्त झाल्यानंतर त्वरितच या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल असे देखील अदिती तटकरे म्हणाले आहेत.
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की योजनेसाठीचा अर्ज कुठे आणि कसा करायचा चला तर जाणून घेऊया…
या योजनेसाठी अर्ज तुम्हाला तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकडे करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक अर्जाचा नमुना देण्यात येईल आणि त्या फॉरमॅटमध्ये तुम्हाला तो अर्ज भरून द्यायचा आहे. एका साध्या कागदावर लिहून तुम्ही हा अर्ज करू शकणार आहात. या अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती ,मोबाईल क्रमांक, अपत्याची माहिती, बँक खात्याचा सर्व तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला आहे ते त्या ठिकाणी लिहायच आहे तारीख ठिकाण टाकून त्या ठिकाणी सही करायची आहे. अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून तुम्हाला पोहोच पावती घ्यायची आहे. अशा पद्धतीने या योजनेसाठीचा अर्ज तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे करू शकता.
अर्जासोबत तुम्हाला कोण कोणती कागदपत्रे जोडावी लागणार?
1]लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला
2]लाभार्थ्याचे आधार कार्ड (जर प्रथम लाभ घेत असाल तर ही अट शिथिल राहील (
3]तसेच कुटुंबप्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला (लक्षात असू द्या वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे)
4]त्यानंतर पालकाचे आधार कार्ड
5]बँक पासबुकची झेरॉक्स
6]रेशन कार्ड (पिवळे अथवा केशरी)
7]मतदान ओळखपत्र
8]शाळेचा दाखला
9]कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
अर्ज केला आता पुढे काय?
आता तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज आणि कागदपत्रे दिल्यानंतर ते नीट तपासून घेतले की, त्यानंतर त्याची नोंदणी तुम्हाला सरकारच्या ऑनलाइन पोर्टल वर जाऊन करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तो अर्ज संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे सुपर्द करून द्यायचा आहे मग अंतिम मंजुरीसाठी हा अर्ज महिला आणि बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे . त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने दोन महिन्याच्या आत या अर्जावर कार्यवाही पूर्ण करावयाची आहे एकदा का लाभार्थी निश्चित झाले की मग शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खातात जमा केली जाणार आहेत.
अशा रीतीने महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये एवढी आर्थिक मदत या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.
मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि ज्या पालकांच्या मुलींचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतर झाला आहे अशा पालकांपर्यंत ही योजना नक्की पोहोचवा.