Lek Ladki Yojna: मित्रांनो नमस्कार आजची आपली ही माहिती एक विषय नसली तरी ती एक महत्वपूर्ण अशी माहिती आहे त्यामुळे याविषयी आपण आज आपल्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अशी ती कोणती माहिती आहे .मी बोलतो आहे लेक लाडकी या योजनेविषयी . महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.
काय आहे लेक लाडकी योजना?
लेक लाडकी या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलीचा जन्म झाल्यास पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर 7000 रुपये अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये तर अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर 75 हजार रुपये अशा रीतीने त्या मुलीच एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणार आहे .
या योजनेचा लाभ कोणाला भेटणार?
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयापेक्षा कमी असणार आहे त्या कुटुंबात एक एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या कुटुंबात पहिल्यांदाच जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्या दोन्ही मुलींना स्वतंत्रपणे योजनेचा लाभ मिळेल .मात्र त्यानंतर सदर जोडप्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे .काही जोडप्यांना अगोदर एक अपत्य असते मात्र ते जेव्हा अपत्य प्राप्तीची दुसरी संधी घेतात तेव्हा त्यांना जुळी मुले झाल्यास अशा प्रकरणात जर एक मुलगी जन्माला आली तर तिला आणि जर दोन्ही मुली जन्माला आल्या तर दोघींनाही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजना कधीपासून लागू होणार?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये लेक लाडकी या योजनेचा उल्लेख केला होता.आता त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पाऊल देखील टाकलेले आहे .मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2023 पासून ही लेक लाडकी योजना राबवण्यात येईल.