Lava Agni 2 5G Next Sale : Lava ने Lava Agni 2 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना 5000 mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि MediaTek Dimensity 7050 चिपसेटचा सपोर्ट मिळतो. कंपनीने हा फोन Lava Agni 5G चा सक्सेसर म्हणून लॉन्च केला आहे, जो कंपनीने 2021 मध्ये लॉन्च केला होता. तुम्ही लावाच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.
Lava Agni 2 5G Price :
Lava Agni 2 5G कंपनीने सिंगल स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च केला आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये आहे, परंतु ग्राहकांना सर्व प्रमुख डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 2,000 सूट दिली जात आहे, त्यानंतर त्याची किंमत 19,999 रुपये होईल. 31 मे रोजी 12 वाजता ya स्मार्टफोन चा Next Sale आहे तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून स्मार्टफोन खरेदी करू शकता.
Lava Agni 2 Specification :
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, Lava Agni 2 5G मध्ये 6.7-इंचाचा Curved डिस्प्ले आहे जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी, 50MP Primary कॅमेरा, MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर आणि Android 13 सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन 66 वॅट्सच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यामध्ये तुम्हाला एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळत आहे. कंपनी ग्राहकांना OS अपडेट 2 वर्षांसाठी आणि सुरक्षा अपडेट तीन वर्षांसाठी देईल. म्हणजेच या बजेट फोनमध्ये तुम्हाला Android 14 आणि 15 चा सपोर्ट मिळेल.
मित्रांनो 20,000 च्या प्राईज रेंजमध्ये या स्मार्टफोनमध्ये खूप जबरदस्त स्पेसिफिकेशन देण्यात आलेले आहे मात्र जर तुम्हाला लाभाचा फोन घ्यायचा नसेल तर वीस हजार रुपयांच्या किमतीमध्ये तुम्ही मोटो g73 5g किंवा रेडमी के फिफ्टी आय या दोन स्मार्टफोन पैकी एक फोन देखील बघू शकता.