मित्रांनो आता बऱ्याच जणांच असं म्हणणं असतं की लॅपटॉप जो आहे त्यामध्ये पावर एवढी आहे की तो डेस्कटॉपच्या अगदी जवळ आला आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. मित्रांनो जर तुम्ही स्टुडंट्स असाल, ग्राफिक्स डिझायनर असाल, किंवा तुमचा स्वतःचा बिसनेस असेल तर तुमच्यासाठी काही महत्वाच्या टिप्स मी सांगणार आहे, चला तर याबद्दल सविस्तर माहिती पाहूया…
- पोर्टेबिलिटी आणि परफॉर्मन्स
मित्रांनो जर तुमचं काम एका ठिकाणी बसून होऊ शकत नसेल किंवा तुम्हाला फिरायचं काम असेल तर तुम्ही लॅपटॉपच घ्यायला हवा. जर तुम्हाला पोर्टेबिलिटी महत्वाची असले तर मित्रांनो नक्कीच तुम्ही लॅपटॉपच घ्यायला हवा. पण मित्रांनो पोर्टेबीलिटीच सगळं काही नसतं तर परफॉर्मन्स सुद्धा खूपच महत्वाचा असतो. जेव्हा आपण मशीन खरेदी करत असतो तेव्हा परफॉर्मन्स आणि लॉन्ग लास्टिंग असायला हवा. तर यामध्ये तुम्ही प्राईझ टू प्राईज कंम्पेअर कराल तर डेस्कटॉप नक्कीच विजेता असतो. मित्रांनो जर तुम्ही लॅपटॉपचा जर फॅन पहिला तर तो खूपच लहान असतो आणि डेस्कटॉपचा फॅन त्यापेक्षा मोठा असतो. त्यामुळे लॅपटॉप गरम झाल्यानंतर त्याचा परफॉर्मन्स कमी होऊन जातो. पण डेस्कटॉप च्या मोठया फॅन्समुळे तो अगदी कुल राहतो आणि त्यामुळे परफॉर्मन्स डेस्कटॉपमध्ये चांगला पहायला मिळतो. परफॉर्मन्समध्ये एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राफिक्स कार्ड लॅपटॉपमध्ये इंटींग्रेटेड आणि डेडीकेटेड दोन्हीही असतात, पण हे ग्राफिक्स कार्ड लहान असतात. हेच जर आपण डेस्कटॉपमध्ये पाहिलं तर ते खूप मोठे असतात त्यामुळे परफॉर्मन्समध्ये डेस्कटॉप अल्वेज टॉप.
- वॉरंटी आणि उपग्रेड
जर तुमच्या लॅपटॉपला काही झालं आणि तुम्ही तो घरी खोलला तर त्याची वारंटी व्हॉइड होऊन जात. जर तुमचा डेस्कटॉप खराब झाला तर तुम्ही त्यासोबत काहीही करू शकता त्याची वारंटी व्हॉइड होत नाही. आणखी एक गोष्ट जेव्हा तुम्ही 50,000- 60,000 रुपयांचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप खरेदी करता 4-5 वर्षासाठी तर त्यामध्ये लॅपटॉपला एक्स्टेंड कर खूप अवघड होऊन जात म्हणजे तुम्ही यामध्ये काहीही ऍड करू शकत नाही. याउलट डेस्कटॉपमध्ये तुम्ही रॅम, स्टोरेज,ग्राफिक्स कार्ड आणि आणखी काहीही ऍड करू शकता आणि ते खुप सोपं असतं मेंटेनन्स, उपग्रेड, रिपेरिंग साठी. पण लॅपटॉप जर घेतला तर तुम्हाला या गोष्टीच अजिबात टेन्शन राहणार नाही म्हणजे ओपन करा आणि सुरु करा.
- पावर कंजप्शन
तर मित्रांनो इलेक्ट्रिसिटी पाहता एखाद्या वेळेस लाईट गेली की डेस्कटॉप लगेच बंद होऊन जातो. काही वेळा लाईट येत जात असते त्यामुळे डेस्कटॉपला प्रोम्ब्लेम येत असतो. पण हेच जर तुम्ही लॅपटॉपकडे पाहिलं तर तर लाईट येवो किंवा जावो यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण लॅपटॉप हा चार्जेबल असतो. आणि हो हे डेस्कटॉप सोबत सुद्धा होऊ शकतं पण त्यासाठी तुमच्याकडे एक इन्व्हर्टर असायला हवा.
- लाईफ
मित्रांनो जर तुम्ही डेस्कटॉपची जर लाईफ पहिली तर ती खूप जास्त असते त्याहिशोबाने डेस्कटॉप हा व्हॅल्यू फॉर मनी असतो. आणि जर तुम्ही लॅपटॉपकडे पाहिलं तर लॅपटॉप एक्स्टेंडेड नसतो त्यामुळे जर तुम्ही लॅपटॉप 3-4 वर्ष वापरला तर तुम्हाला नंतर तो बदलावा लागेल.
मित्रांनो याबद्दल जर मी सांगू तर जर तुम्ही कॉलेज स्टुडंट्स असाल तर तुमच्यासाठी फक्त लॅपटॉपच बेस्ट राहील डेस्कटॉप बद्दल तुम्ही विचार सुद्धा करू नका. आणि जर गेमिंगचे शौकीन असाल तर डेस्कटॉप अल्वेज बेस्ट. आणि जर आत्ता सध्या तुमच्याकडे पैसे कमी असेल आणि हळूहळू जर तुम्हाला यामध्ये उपडेट करायचा असेल तर डेस्कटॉप घ्या आणि जर तुम्हाला ह्यासगळ्या झंजट नको असेल तर तुम्ही लॅपटॉप घेऊ शकता. माझ्या मते लॅपटॉप पेक्षा डेस्कटॉप व्हॅल्यू फॉर्म मनी असतो आणि परफॉर्मन्स सुद्धा अगदी बेस्ट असतो. तर मित्रांनो यापैकी तुम्ही कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्याल ते कमेंटमध्ये नक्की सांगा.. धन्यवाद