मोठ्या बँकांच्या खात्यातील शिल्लक तपासणीसाठी मिस कॉल नंबर जारी
लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंटला जमा झाले किंवा नाही हे चेक करण्यासाठी सध्या बहुतांश बँकांमध्ये मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
तर खेड्यापाड्याच्या ठिकाणी हे पैसे चेक करण्यासाठी सुद्धा पैसे मागितले जात आहे पण यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर केलेला असेल तर खाली बँक आणि त्यासमोर एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून फक्त मिस कॉल द्या त्यानंतर लगेचच तुम्हाला एक मेसेज येईल ज्यामध्ये तुमच्या अकाउंट मध्ये आता किती पैसे/रक्कम शिल्लक आहे ते कळून जाईल.
आता आपल्या बँक खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक माहिती मिळवण्यासाठी फक्त एक मिस कॉल करावा लागेल. देशातील प्रमुख बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली आहे. खालीलप्रमाणे काही प्रमुख बँकांचे मिस कॉल नंबर दिले आहेत:
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): 09223766666
- HDFC बँक: 18002703333
- ICICI बँक: 9594612612 किंवा 9215676766
- अॅक्सिस बँक: 18004195959
- पंजाब नॅशनल बँक (PNB): 18001802223
- बँक ऑफ बडोदा (BoB): 8468001111
- युनियन बँक ऑफ इंडिया: 09223008586
- कॅनरा बँक: 9015483483
- IDBI बँक: 18008431122
- बँक ऑफ इंडिया (BoI): 09015135135
- कोटक महिंद्रा बँक: 18002740110
- यस बँक: 09223920000
- इंडसइंड बँक: 18002741000
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 9555244442
- इंडियन बँक: 09289592895
- UCO बँक: 18002740123
- फेडरल बँक: 8431900900
- IDFC फर्स्ट बँक: 18002700720
- महाराष्ट्र ग्रामीण बँक : 7834888867
- इंडियन Post Bank ( पोस्ट बँक) : 8424054994 / 8424046556 किंवा 7799022509 या नंबर वर फक्त Miss Call द्या
- Bank of Maharashtra : 9222281818
ग्राहकांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून संबंधित बँकेच्या मिस कॉल नंबरवर कॉल करावा, आणि काही क्षणांतच त्यांना एसएमएसद्वारे त्यांच्या खात्यातील शिल्लक मिळेल.
तथापि, ग्राहकांनी हे सुनिश्चित करावे की, त्यांनी वापरत असलेले मिस कॉल नंबर त्यांच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा ग्राहक सेवा केंद्रातून मिळवलेले असावे, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता असू शकते.
कोणतीही बँक तुम्हाला तुमचा ओटीपी मोबाईल नंबर वर विचारत नाही त्यामुळे कुणालाही तुमचे बँक अकाउंट क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यावरील नंबर किंवा तुम्हाला आलेला ओटीपी कधीही कुणाला सांगू नये जर तुम्ही ओटीपी सांगितला तर तुमच्या सोबत फ्रॉड होऊ शकतो.