नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली होती… आणि आता खास महाराष्ट्रातील तरुणांसाठी मुख्यमंत्री लाडका भाऊ ही योजना सुरु केली आहे. या योजनेतर्गत महाराष्ट्रातील जे तरुण आहेत त्यांना 10 हजार रुपये महिना सुरु आहे! तर यासाठी काही निकष असणार आहे फक्त काहीच तरुण यासाठी अर्ज करू शकणार आहेत. तर नक्की कोण यासाठी अर्ज करू शकणार आहे? आणि काय आहे ही योजना व यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे ती व्यवस्थित वाचा…
• लाडका भाऊ योजनेसाठी पात्र उमेदवाराच्या शिक्षणानुसार प्रति महिना अशा पद्धतीने हे पैसे दिले जाणार आहे, म्हणजे 12वी पास, ITI आणि डिप्लोमा पास, पदवीधर अशापद्धतीने त्याचे वेतन मिळणार आहे…
1. 12 वी पास विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये प्रतिमहीना
2. ITI किंवा Diploma झालेल्या विद्यार्थ्यांना – 8 हजार रुपये प्रति महीना
3. पदवीधर विद्यार्थ्यांना – 10 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे.
• लाडका भाऊ योजना पात्रता
1. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2. विद्यार्थ्यांचे शिक्षण हे कमीत कमी बारावी झालेले असावे.
3. ITI पास विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
4. डिप्लोमा झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
5. पदवीधर विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
उमेदवारावे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास / आयटीआय / पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
• वयोमर्यादा
18 ते 35 वयातील सर्व पात्र तरुण यासाठी अर्ज करू शकतात.
• अर्ज करण्यासाठी लागणारे कागतपत्रे
यासाठी खाली दिलेले तीन महत्वाचे कागतपत्रे आहेत
1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. बँकेचे पासबुक
3. गुणपत्रक (मार्कशीट)
• अर्ज कसा करायचा
लाडका भाऊ या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, त्यामुळे तुम्ही अर्ज डायरेक्ट शासनाच्या पोर्टल वर करू शकता…
ऑनलाईन अर्जाची लिंक – https://rojgar.mahaswayam.gov.in/
योजनेचा GR/ PDF : Download
ईतर नियम :
या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून १० दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर, सबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय
राहणार नाही.
प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही.
• निवड कशाप्रकारे होईल
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर पुढे तुमचा अर्ज तपासला जाईल, त्यानंतर तुमचे सिलेक्शन केले जाईल आणि प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक महिण्याला तुमच्या शिक्षणानुसार पैसे दिले जातील..
लक्षात ठेवा हा महाराष्ट्र सरकारचा अप्रेंटिसशिप प्रोग्राम आहे, ज्यामध्ये तुम्हाला 6 महिने काम कराव लागेल आणी त्याबदल्यात तुम्हाला हा पगार मिळेल!
माझ्या मते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल ची घोषणा करताना अपुरी माहिती देण्यासोबतच राजकीय घोषणा करण्याच्या नादात राज्यातील युवकांना भरकटवण्याचं काम केल्याचं निदर्शनास येतं, कारण ही योजना अगोदरपासूनच सुरू असताना त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि ती नव्याने सुरू करण्यात आली आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी इतिहासात पहिल्यांदाच अशी कुठली योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना यामधून चुकीचा मेसेज गेल्याचे दिसून येतंय! आजही अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की त्यांना घरी बसून हे पैसे मिळणार आहेत मात्र अशा पद्धतीने कुठल्याही लाडक्या भावाला घरी बसून पैसे मिळणार नाहीत तर ही 1974 पासून सुरू असलेली “रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम” योजना असून यामध्ये कालानुरूप काही बदल करण्यात आलेले आहे – नंदू पाटील.