JioPhone Prima 4G Launch: Reliance Jio ने त्यांचा नुकताच एक नवीन फोन लॉन्च केला आहे. आणि त्याची विक्री देखील सुरू झाली आहे. तसेच या फोनमध्ये अनेक नवीन फीचर्स देखील देण्यात आले आहेत .चला तर मग जाणून घेऊया या नवीन फोन बद्दल सविस्तर अशी माहिती
या फोनबद्दल विशेष बाब सांगायची झाली तर या फोन मधून तुम्हाला युपीआय पेमेंट करणे सुद्धा आता शक्य होणार आहे. तसेच यात गुगल व्हाईस असिस्टंट देखील देण्यात आला आहे. तसेच जिओच्या नवीन फोन मध्ये ओटीपी ॲप्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
त्यामुळेच ग्रामीण भागात 2G आणि 3G फोन वापरणाऱ्यांसाठी आता हा जिओचा नवीन फोन एक चांगला पर्याय ठरणार आहे. त्यामुळेच आता केवळ तुम्हाला युपीआय पेमेंट करण्यासाठी स्मार्टफोन घेण्याची गरज भासणार नाही. या फोनवरूनच आता तुम्ही यूपीआय पेमेंट करू शकणार आहात.
JioPhone Prima 4G फोन ची किंमत किती?
जिओ ने लॉन्च केलेल्या नवीन फोनची किंमत फक्त 2599 रुपये एवढी ठेवण्यात आले आहे. आणि हा फोन तुम्हाला रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि ॲमेझॉन वर उपलब्ध आहे. त्यामुळेच कमी किमतीत तुमच्यासाठी हा एक चांगला फोन करू शकतो.
JioPhone Prima 4G फीचर्स
Jio च्या या फोनमध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात 23 स्थानिक भाषांचा सपोर्ट देखील तुम्हाला मिळतो. तसेच या फोनमध्ये तुम्हाला 1800 mAh ची बॅटरी मिळते जी की दिवसभर तुम्हाला पुरते असा दावा कंपनीने केला आहे.
त्याचप्रमाणे Jio Phone Priama 4G Phone मध्ये 0.3 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 512 MB ची रॅम देण्यात आली आहे. तसेच या फोनचा स्टोरेज तुम्ही 128 जीबी पर्यंत देखील वाढू शकता. तसेच या फोनमध्ये तुम्हाला यूपीआय पेमेंटचे ऑप्शन देण्यात आले आहे, तसेच गुगल व्हाईस असिस्टंट अशा पद्धतीचे विविध फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच फेसबुक आणि व्हाट्सअप यासारखे ॲप्स देखील तुम्हाला या फोनमध्ये इनबिल्ड मिळतात. तसेच जिओ सिनेमा ॲप्स देखील यामध्ये तुम्हाला मिळते.