मित्रांनो नमस्कार तुम्ही जर सगळ्यात स्वस्त फोन घेऊ इच्छित असाल तर ही माहिती तुमच्यासाठी एकदा बघाच…!!!
रिलायन्स जिओ या भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीने नुकताच आपला Jio Bharat 4G फोन लॉन्च केला आहे. Jio Bharat 4G phone भारतात आता विक्रीसाठी देखील उपलब्ध झाला आहे. तुम्ही हा फोन Amazon .com वरून खरेदी करू शकणार आहात .
चला तर मग या फोन बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
काय आहेत Jio Bharat 4G फोनचे फीचर्स?
जिओ भारतच्या या 4 जी फोन मध्ये तुम्हाला 1.77 इंचाचा डिस्प्ले मिळतो तसेच 3.5मिमी हेडफोन कनेक्टर मिळते LED फ्लॅश सह 0.3 मेगापिक्सल चा कॅमेरा देखील यामध्ये तुम्हाला मिळतो. फोनमध्ये तुम्हाला १००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे . हा फोन तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध असणार आहे भारतातील ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या फोनमध्ये एकूण 23 भाषांचा सपोर्ट देण्यात आला आहे.
रिलायन्स जिओने लॉन्च केलेला जिओभारत हा एक जिओ सिम लॉक फोन आहे .याआधी आलेल्या जिओ फोन प्रमाणेच यामध्ये देखील तुम्हाला जिओ सिम ठेवणे आवश्यक आहे. जिओ भारत फोनची 4g अनुकूलता तसेच त्यांना जिओच्या विशाल 4G नेटवर्क क्रिस्टल क्लियर असा संवाद देखील साधण्यासाठी सक्षम असणार आहे .हा फोन एक्स्टर्नल मायक्रो एसडी कार्डला देखील सपोर्ट करतो. वापरकर्ते याचे स्टोरेज 128 जीबी पर्यंत वाढू शकणार आहेत .
फोनची किंमत किती?
Realince Jio च्या Jio Bharat या 4G फोनची किंमत फक्त 999 रुपये इतकी असणार आहे. या फोनचा रिचार्ज प्लॅन हा 123 रुपयापासून सुरू होणार आहे त्याची वैधता 28 दिवसाची असणार आहे. अनलिमिटेड व्हाईस कॉल आणि 14 जीबी डेटा प्लान तुम्हाला मिळणार आहे . 1234 रुपयांमध्ये कंपनी एक वर्षाचा इंटरनेट प्लॅन ऑफर करते ज्या तुम्हाला 16 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल हे फायदे त्यामध्ये मिळणार आहेत.
अवघ्या 999 रुपयांमध्ये तुम्ही हा फोन विकत घेऊ शकणार आहात भारतात आजही मोठ्या संख्येने लोक 2G फोनवर अवलंबून आहेत अशातच आता Jio Bharat 4G या स्वस्त फोन द्वारे जे लोक आजही 2G वापरत आहे त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणण्याचे जिओचे ध्येय आहे .अशा युजरसाठी कंपनीने उत्तम फीचर्स असलेला जिओ भारत फोर जी फोन लॉन्च केला आहे.
आतापर्यंत Jio Bharat 4G हा Phone फक्त जिओ रिटेल पार्टनर्स स्टोअरवर्स आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरवर उपलब्ध होता पण आता हा फोन तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाईटवर देखील उपलब्ध असणार आहे. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेलच तर तुम्ही Amazon .com यावरून देखील आपण विकत घेऊ शकता.
यामध्ये तुम्हाला अनेक प्रीमियम फीचर्स देखील दिले आहेत यामध्ये तुम्हाला एचडी कॉलिंग देखील मिळते तसेच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय देखील यात देण्यात आला आहे .या फीचर्स फोन मध्ये तुम्हाला यूपीआय पेमेंटचा देखील पर्याय मिळतो केवळ पेमेंटस नाही तर त्यात तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मचे देखील सस्क्रिप्शन मिळते . यामध्ये तुम्ही जिओ सिनेमाचा देखील आनंद घेऊ शकता.
Jio Bharat 4G आढळणार आहे हा फोन काळया आणि लाल रंगात तुम्हाला उपलब्ध असणार आहे. या फीचर्स मध्ये तुम्हाला मागील बाजूस कॅमेरा आणि टॉर्च देखील सुविधा असणार आहे.
तर मित्रांनो जिओच्या या सगळ्यात स्वस्त फोनची माहिती तुम्हाला कशी वाटली ते प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आणि तुमच्या सगळ्यात स्वस्त फोन घेऊ इच्छिणाऱ्या मित्राला ही माहिती नक्की सांगा!