Reliance Jio: Jio, Airtel आणि Vi या भारतातील प्रमुख तीन दूरसंचार कंपन्या आहेत ज्या ग्राहकांना लक्षात ठेवून नेहमी नवनवीन प्लॅन घेऊन येतात. तसेच या कंपन्या अतिरिक्त डेटा, OTT फायदे, रोलओव्हर डेटा इत्यादी ऑफर आपल्या ग्राहकांना देत असतात. त्यामुळे ग्राहक देखील त्या कंपन्यांकडे आकर्षित होतात.
अनेक जण आता आपआपल्या गरजेनुसार एक महिना, तीन महिने आणि एक वर्षाचे प्लॅन निवडत असतात. परंतु हे प्लॅन निवडत असताना अनेक जण आपल्याला कोणता प्लान परवडेल याच्या शोधात असतात . त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे की, Jio हा टॉप टेलिकॉम ऑपरेटरपैकी आता एक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला jio च्या 30 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनबद्दल सविस्तर अशी चर्चा करणार आहोत, ज्यामधून तुम्हाला अमर्यादित डेटा आणि अनेक फायदे मिळतात. चला तर मग या जिओचा प्लॅन बद्दल जाणून घेऊया.
काय आहे रिलायन्स जिओचा ३० दिवसांचा प्लॅन?
मित्रांनो रिलायन्स जिओनी आता दैनंदिन डेटा मर्यादा नसलेला 30 दिवसाचा प्लॅन सादर केला आहे. Jio चा हा प्लॅन 296 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 25 GB डेटा देण्यात येतो आहे, हा डेटा तुम्ही कधीही आणि कितीही वापरु शकता. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डेटा वापरावरती दैनिक अशी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.
तसेच या प्लॅन मध्ये तुम्हाला JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity सारखी अनेक अतिरिक्त सुविधा या प्लॅनमध्ये तुम्हाला समाविष्ट आहेत. तसेच या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देखील देण्यात आली आहे. तसेच तुमच्याकडे जर 5G फोन असल्यास, या प्लॅनमध्ये Jio वेलकम ऑफर देखील समाविष्ट आहे, जी अमर्यादित 5G डेटा तुम्हाला प्रदान करते.
तर मित्रांनो रिलायन्स जिओच्या नवीन प्लॅन बद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच नवनवीन प्लॅन बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.