iPhone लवर्ससाठी आनंदाची बातमी! iPhone 15 ची प्रतीक्षा समाप्त होणार आहे. Apple आपला नवीन iPhone 15 सीरीज स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. आज (म्हणजेच 12 सप्टेंबर) Apple त्यांचा ‘वंडरलुस्ट’ कार्यक्रम होस्ट करेल, जो भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरू होईल. कंपनीने अगोदरच सप्टेंबर लॉन्चची घोषणा केली होती. परंतु, गेल्या काही महिन्यांत अनेक अहवाल समोर आले आहेत, यामध्ये हिंट केले गेले आहे की इव्हेंटमध्ये कंपनी आपली आयफोन 15 Series सोबत-सोबत Apple Watch आणि Watch Ultra मॉडेल लॉन्च करणार आहे. हे देखील सांगितले जात आहे की कार्यक्रमामध्ये कंपनी आपल्या अपकमिंग सिस्टम अपडेटचे रिलीज डेट घोषित करेल. जर तुम्ही हा कार्यक्रम लाइव्ह पाहू इच्छित असाल आणि नवीन आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर चला या आर्टिकल मध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया…
- लाईव्ह इव्हेंट कसा पाहावा
Apple चा वंडरलस्ट लॉन्च कार्यक्रम मंगळवार (१२ सप्टेंबर) रात्री १०:३० वाजता कॅलिफोर्निया च्या अँपल पार्कमध्ये सुरू होईल. तुम्ही इव्हेंटला ऍपलच्या यूट्यूब चॅनलवर आणि ऍपलच्या वेबसाइटवर पाहू शकता. ऍपल टीव्ही+ आणि ऍपल ऍप च्या मदतीने सुद्धा पाहू शकता.
- भारतात एवढी असेल नवीन मॉडेलची किंमत ( Potential ) iPhone 15 आणि त्याचे प्लस व्हेरियंट त्यांच्या सध्याच्या किमती कायम ठेवू शकतात. Apple ने सध्याच्या किंमती धोरणावर टिकून राहिल्यास, आम्ही iPhone 15 मॉडेल्सची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होण्याची अपेक्षा करू शकतो. लीकमध्ये असा दावा करण्यात आला आहे की कंपनी नवीन स्टॅण्डर्ड मॉडेल जुन्या किंमतीप्रमाणेच लॉन्च करेल. iPhone 15 Plus ची किंमत 89,900 रुपये राहू शकते.
त्याचप्रमाणे iPhone 15 Pro च्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की, iPhone 15ची किंमतीत 100 डॉलर ने वाढ होऊ शकते आणि प्रो मॅक्सची किंमत $200 ने वाढू शकते. त्यामुळे, लीकनुसार, iPhone 15 Pro व्हेरियंटची किंमत $999 (अंदाजे रु. 82,900) वरून $1,099 (अंदाजे रु. 91,200) पर्यंत वाढवली जाऊ शकते. परंतु, याचा अर्थ असा नाही की Apple भारतात त्याच किंमतीत प्रो मॉडेल लाँच करेल कारण यूएस आणि भारतीय बाजारांमध्ये किंमतींमध्ये नेहमीच मोठा फरक असतो.