आयफोन चे चाहते आयफोन 15 हा मार्केटमध्ये कधी येणार याची उत्सुकतेने वाट पाहत आहे मात्र त्यांची आताही उत्सुकता संपणार आहे कारण लवकरच आयफोन 15 हा मार्केटमध्ये येत आहे विशेष म्हणजे त्याची तारीख देखील आता निश्चित झाली आहे.
येणाऱ्या 12 सप्टेंबर रोजी Iphone 15 बाजारात येत आहे Iphone 15 ,आयफोन 15 प्रो मॅक्स, iPhone 15 अल्ट्रा बाजारात येणार आहे .
या वेळेला मात्र आयफोन वापरकर्त्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. कारण युएस, युरोप, युके आणि इतर बाजारपेठेतील लोकांसोबतच भारतातील लोकांना देखील यावेळी आयफोन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याआधी आयफोन करता वाट पाहावी लागत असे. आता मात्र तुम्हाला आयफोन लगेच उपलब्ध होणार आहे. भारतात देखील इतर देशाप्रमाणे उपलब्ध होणार आहे भारतात देखील इतर देशांप्रमाणे आयफोन 15 हा अन बॉक्स केला जाणार असल्याचे एका रिपोर्ट मधून सांगण्यात आले आहे.
इकॉनॉमिक्स टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ॲपल यावर्षी लवकरच भारतात आयफोन 15 चे अनावरण करण्याची योजना आखत असल्याचे सांगण्यात आले आहे. ॲपल भारतात एकाच वेळी किंवा काही दिवसाच्या अंतराने Iphone 15 लॉन्च करणार आहे .असे असे झाल्यास ग्राहकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे. आयफोन पंधराचे उत्पादन आता भारतातील तामिळनाडूमध्ये राज्यात देखील सुरू झाले आहे.
आयफोन 15 या फोनची वैशिष्ट्ये काय असणार?
iPhone 15 मध्ये 6.1 इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड – स्टाईल डिस्प्ले देखील असेल. गेल्या वर्षी पर्यंत ते प्रो मॉडेल पुरते मर्यादित होते. कामगिरीबद्दल सांगायचं झाल्यास आयफोन 15 पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रोसेसर सह येऊ शकतो. तसेच असेही सांगितले जात आहे की या नवीन आयफोनच्या सिरीज मध्ये A16 बायोनिक चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे.
आयफोनच्या कॅमेराबद्दल सांगायच झाल्यास आयफोन 15 मध्ये 48 मेगापिक्सेल इमेज सेन्सर सह ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. त्यात सॉफ्टवेअर अपडेट ही दिले जाऊ शकते आयफोन पंधरा वरून चांगल्या बॅटरी बॅकअप देखील दिला जाऊ शकतो.
Iphone 15 ची किंमत नेमकी किती असणार?
आता भारतातील आयफोनच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती आयफोन 15 ची भारतीय मार्केटमधील किंमत नेमकी किती असणार चला तर बघूया आयफोन पंधराची भारतीय मार्केटमधील किंमत नेमकी किती असणार. भारतात आयफोन 15 ची किंमत ही जवळपास 80 हजार रुपये असण्याची शक्यता आहे ही सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत असू शकते. तसेच असेही बोलले जात आहे की आयफोन ही कंपनी ॲपल iphone 15ची किंमत वाढवू देखील शकते.
त्यामुळेच मित्रांनो भारतात 12 सप्टेंबरला आयफोन 15 लॉन्च होत आहे त्याबद्दलची ही माहिती आपण या ठिकाणी बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुमच्या आयफोनच्या चाहत्या मित्राला ही माहिती नक्की सांगा.