Infinix Smart 8 HD: स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने भारतीय बाजारात ग्राहकांसाठी आता एक जबरदस्त असा स्मार्टफोन आणला आहे . भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन Infinix कंपनीने हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
Infinix च्या या लेटेस्ट स्मार्टफोनची बरीचशी चर्चा पाहायला मिळत आहे. ग्राहकांना माहाग असणाऱ्या आयफोन चा फील हा स्मार्टफोन दिल्याशिवाय राहणार नाही .या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कंपनीने ॲपल डायनामिक आइसलँड सारखे फीचर्स दिले आहेत. ज्याला मॅजिक रिंग असे नाव देखील देण्यात आले .आहे चला तर मग जाणून घेऊया Infinix Smart 8 HD या स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्स विषयी….
Infinix Smart 8 HD ची किंमत?
Infinix Smart 8 HD या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 3 GB रॅम 32 GB चा स्टोरेज देण्यात आला आहे .आणि व्हेरियंटची किंमत तुम्हाला ६२९९ रुपये एवढी ठेवण्यात आले. परंतु कंपनी हा स्मार्टफोन 5699 रुपयांना विक्री करणार आहे .या डिवाइस मध्ये तुम्हाला शायनी गोल्ड , क्रिस्टल ग्रीन ,गॅलेक्सी व्हाईट आणि टिंबर ब्लॅक हे कलर उपलब्ध असणार आहे . तसेच कंपनीने या स्मार्टफोनवर एक ऑफर देखील ठेवली आहे .त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन जर ॲक्सिस बँक च्या कार्डचा वापर करून खरेदी केला तर तुम्हाला अजून 10 टक्के चा डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे .या स्मार्टफोन ची विक्री 13 डिसेंबर पासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करताना ॲक्सिस बँक च्या कार्डचा वापर करून 10% चा एक्सट्रा डिस्काउंट मिळू शकता.
Infinix Smart 8 HD चे फीचर्स
हा स्मार्टफोन 90 Hz रिफ्रेश रेट सह या फोनमध्ये तुम्हाला 6.6 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे .ज्याचा 180Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट मिळतो .स्पीड आणि मल्टी टास्किंग साठी या डिवाइस मध्ये तुम्हाला युनिसॉक टी 606 प्रोसेसर आणि ग्राफिक्स साठी माली जी 57 जीपियू चा वापर करण्यात आला आहे.
तसेच इनफिनिक्सच्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 3 GB रॅम आणि 32 GB चा स्टोरेज देण्यात येतो .तसेच मायक्रो एसडी कार्ड सह स्टोरेज 2 टिबी पर्यंत तुम्ही वाढू देखील शकता. Infinix या नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कॅमेरा सेटअप देखील खूप चांगला देण्यात आला आहे .या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 13 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट साईडला आठ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच Infinix Smart 8 HD मध्ये तुम्हाला 10 W चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे आणि 5000 mAh ची बॅटरी या ठिकाणी देण्यात आली आहे. तसेच सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे.
त्यामुळेच तुमच्यासाठी हा एक स्वस्तात मस्त फीचर्स असलेला एक जबरदस्त असा स्मार्टफोन ठरू शकतो. मित्रांनो या स्मार्टफोन विषयी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा