नमस्कार मित्रांनो India Post GDS साठी लवकरच 30 हजार पदांची मेगा भरती होणार आहे… महत्वाचे म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा होत नाही, फक्त 10वी च्या मार्क्स वर तुमचे सिलेक्शन केले जाते..
18 ते 40 वयातील सर्व 10वी पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… जुलै च्या शेवटच्या आठवड्यात याच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे!
तेव्हा ही भरती कशाप्रकारे होईल, याची सिलेक्शन प्रोसेस काय असेल यासाठी पगार किती मिळेल व या भरती संदर्भातील डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
तर मित्रांनो INDIAN POST मध्ये GDS म्हणजेच Gramin Daak Sevak या पदासासाठी लवकरच भरती होणार. आणि याच्या ऑनलाईन अर्जाला जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही यासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर खास तुमच्यासाठी आपण या आर्टिकलमध्ये या बद्दलची डिटेल माहिती दिलेली आहे, त्यामुळे अर्ज करण्याअगोदर ही सर्व माहिती डिटेल मध्ये नक्की वाचा…
• शैक्षणिक पात्रता (Educational Eligibility)
GDS म्हणजेच ग्रामीण डाक सेवक या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त 10 वी पास असते, म्हणजेच सर्व 10वी पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, सोबतच अर्ज करणाऱ्याला तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, आणि हो अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सायकल चालवता यायला पाहिजे…
• वयोमर्यादा
तर 18 ते 40 वयातील सर्व 10 वी पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, म्हणजेच उमेदवार कमीत कमी 18 वर्षाचा आणि जास्तीत जास्त 40 वर्षाचा असायला हवा.
• निवड कशाप्रकारे होते (selection Process)
याची सिलेक्शन प्रोसेस सोप्या भाषेत सांगायची झाली तर यासाठी एका ठिकाणी जेवढे अर्ज आलेले असतात त्यापैकी ज्या उमेदवाराला 10वीत सर्वात जास्त मार्क्स असतात, त्या विद्यार्थ्यांची डायरेक्ट सिस्टमद्वारे निवड केली जाते आणि त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन केले जाते…
• पगार किती मिळतो (Sallary)
तर मित्रांनो यासाठी पगार हा 12000 ते 29,380 यादरम्यान दिला जातो, जो की महिन्याला म्हणजेच मासिक स्वरूपात दिला जातो…
तर महत्त्वपूर्ण अशी ही माहिती आहे त्यामुळे तुमच्या सर्व 10 वी पास मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा यासाठी अर्ज करू शकतील…!