मित्रांनो ‘कोण बनेगा करोडपती’ हा टीव्हीवरील सर्वात पॉप्युलर क्वीज शो आहे. आणि त्यांचा सिजन 15 लवकरच येणार आहे. जर तुम्ही सुद्धा या शो मध्ये भाग घेण्यास इच्छुक असाल तर तयार रहा. कोण बनेगा करोडपतीच्या सिजन 15 साठी 29 एप्रिल पासून रजिस्ट्रेशन सुरु आहेत. सोनी टीव्ही वरती सुरु असणाऱ्या या शोला अमिताभ बच्चन होस्ट करतात. तुम्हाला आम्ही या आर्टिकलमध्ये कोण बनेगा करोडपती मध्ये रजिस्ट्रेशन कसे करतात त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत.
- कोण बनेगा करोडपती सिजन 15
मित्रांनो सोनी टीव्हीने कोण बनेगा करोडपती 2023 चा प्रोमो नुकताच शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये होस्ट अमिताभ बच्चन हॉट चेअर वर बसलेले आहेत. आणि एक महिला अमिताभ बच्चनला विचारते की काय मी खेळू शकते. तर अमिताभ बच्चन त्यावर म्हणतात तुमचा फोन उचला आणि रजिस्ट्रेशन करा, कारण रजिस्ट्रेशन प्रोसेस 29 एप्रिल पासून सुरु झालेली आहे.
- कोण बनेगा करोडपती सीजन 15 साठी रजिस्ट्रेशन कसे करायचे.
कोण बनेगा करोडपती सिजन 15 च्या रजिस्ट्रेशन साठी SonyLIV अँप किंवा sms च्या माध्यमातून केले जाते. मित्रांनो यामध्ये तुम्हाला दररोज एक प्रश्न विचारला जाईल, त्याचे उत्तर sms किंवा SonyLIV अँपच्या मदतीने द्यायचे आहे.
- कोण बनेगा करोडपती 2023 साठी काही अटी
कोण बनेगा करोडपती सिजन 15 मध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला पुढील अटी मान्य कराव्या लागतील.
रजिस्ट्रेशन करतेवेळी कॅन्डीडेटचे वय 18 वर्ष पूर्ण असायला हवे.
कॅन्डीडेट भारतीय नागरिक असायला हवा.
त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे अपराधी रेकॉर्ड किंवा त्याच्यावर कोणत्याच प्रकारचे आरोप नसायला हवे.
KBC 2023 करिता कॅन्डीडेट मानसिक आणि शारीरिक फिट असायला हवा.
- KBC 2023 साठी निवड प्रक्रिया
KBC 2023 करिता सिलेक्शनची पहिली स्टेप आयडेंटी वेरिफिकेशनची असते. त्यासाठी KBC ची टीम कॅन्डीडेट सोबत फोनवर बोलणी करून घेतात.
वेरिफिकेशन नंतर ऑडिशन साठी बोलवले जाते. ऑडिशन मध्ये सिलेक्ट झाल्यानंतर कॅन्डीडेटला आपले डॉक्युमेंट व्हेरिफाय करावे लागतात.
त्यानंतर कॅन्डीडेटला क्वीज टेस्ट मध्ये भाग घ्यावा लागतो, आणि त्यामध्ये जर त्यामध्ये यशस्वी झाला तर त्यानंतर त्याला इंटरव्हिव्ह साठी बोलवले जाते. यानंतर काही 10 कॅन्डीडेटला शॉर्टलिस्ट केल्या जाते.
शो मध्ये भाग घेण्यासाठी कॅन्डीडेटला एक आणखी क्वीज राउंडमध्ये भाग घ्यावा लागतो. कॅन्डीडेटला जेवढ्या लवकर होईल प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते. आणि नंतर विजेत्याला अमिताभ बच्चन सोबत कोण बनेगा करोडपती या शो मध्ये भाग घेण्याचा चान्स मिळतो.
- SonyLIV अँप मधून रजिस्टर कसे करायचे
सर्वात अगोदर गुगल प्लेस्टोर वरून किंवा अँपल स्टोर वरून sonyLIV अँप डाउनलोड करा.
SonyLIV अँप ओपन करा आणि KBC च्या लिंक वर क्लिक करा.
तुम्हाला रजिस्ट्रेशन स्क्रीनवर प्रश्नाचे योग्य उत्तर द्यावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला सर्व महत्वाची माहिती द्यावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल.
- Sms वरून KBC साठी रजिस्ट्रेशन कसे करावे.
Sms वरून रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला 29 एप्रिलपासून रात्री अमिताभ बच्चनने विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यावे लागेल.
Sms वरून उत्तर पाठविण्यासाठी 3 रुपये द्यावे लागतात, परंतु हे जिओ युजर्स साठी फ्री आहे. दिलेल्या वेळातच तुम्हाला प्रश्नाचे योग्य उत्तर पाठवावे लागेल.
एरटेल, जिओ, बीएसएनएल, वोडाफोन – आयडिया युजर्स 50903 या नंबरवर SMS करून रजिस्ट्रेशन करू शकता.
मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर माहितीसाठी आपल्या टेक मराठी पेजला नक्की फॉलो करा.
धन्यवाद..