How to use internet in Flight Mode :एअरप्लेन मोडवर इंटरनेट कसे वापरता येईल असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. अनेक वेळा आपला स्मार्टफोन हा एअरप्लेन मोडवर ठेवणे आपल्यासाठी खूप महत्त्वाच असतं. परंतु अशा वेळेस स्मार्टफोन हा एअरप्लेन मोडवर ठेवल्यामुळे आपल्या अनेक कामांना अडथळा येतो. आपली अनेक महत्त्वाची कामे आपल्याला करता येत नाही जसे की आपल्याला मेसेज पाठवता येत नाही, ई-मेल पाठवता येत नाही ,एखाद्या सोशल ऍप चा वापर करता येत नाही. तसेच आपण युट्युब वरती व्हिडिओ देखील पाहू शकत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टीवर एक उपाय आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलचा एअरप्लेन मोड न हटवता देखील इंटरनेटचा वापर करू शकता कसं चला तर सांगतो…
Force LTE Only (4G/5G)
• सर्वात अगोदर तुम्हाला गुगल प्ले वरून Force LTE Only (4G/5G) हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
• हे ॲप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये ते इन्स्टॉल करावे लागेल.
•हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्यासमोर चार पर्याय दिसतील
•यामधील दुसरा पर्याय METHOD2 :(ANDROID 11+) वर क्लिक करा
•त्यानंतर तुम्ही तुमच्या फोनच्या इन्फॉर्मेशन मध्ये जा आणि मोबाईल रेडिओ हा पर्याय त्या ठिकाणी निवडा.
•मोबाईल रेडिओ पॉवर हा पर्याय इनेबल करा
•त्यानंतर तुमच्या मोबाईल मधील एअरप्लेन मोड ऑन करा.
आता तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा स्मार्टफोन हा एअरप्लेन मोडवर असेल मात्र त्यात डेटा हा सुरू राहील, आणि तुम्हाला तुमच्या साइटवर जाऊन तुमची कामे करता येतील. तसेच तुम्हाला WhatsApp सहित अनेक सोशल साईट ॲप्स देखील वापर करता येईल. तसेच तुम्ही युट्युब वर व्हिडिओ देखील आता पाहू शकता. अशा पद्धतीने तुमचा मोबाईल हा एअरप्लेन मोडवर असताना देखील तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकणार आहात. पण Force LTE एप प्रत्येक स्मार्टफोनला सपोर्ट करत नाही.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच टेक विषयी माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा