मित्रांनो तुम्ही हे आर्टिकल बघताय याचा अर्थ एकतर तुमचा नंबर बॅन झालाय किंवा तुमच्या मनात नंबर बॅन होण्याची भीती आहे. मित्रांनो जर तुमचा नंबर बॅन झाला तर ते अनबॅन कसे करायचे, हे आज आपण या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत. की तुमचं व्हाट्सअँप जर का बॅन झाले असेल तर ते अनबॅन कसं करायचं. पुन्हा त्याच नंबर वरती व्हाट्सअँप सुरु कसं करायचं. अगदी लहान प्रोसेस आहे पण 100% तुमचे जे व्हाट्सअँप आहे ते नक्की सुरु होईल. त्यामुळे प्रोसेस जी आहे ती अगदी जशी सांगितली आहे तशी फॉलो करायची आहे.
- व्हाट्सअँप अनबॅन करण्यासाठी स्टेप्स
Step 1 : मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला प्लेस्टोर वरती जायचं आहे आणि व्हाट्सअँप सर्च करायचे आहे.
Step 2 : त्यानंतर येथे तुम्हाला developer Contact वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तेथे एक ई-मेल आयडी दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे आणि तुम्ही सरळ G- mail वरती जाल. त्यानंतर मित्रांनो येथे तुम्हाला Subject आणि तुमचा ई-मेल टाईप करायचा आहे.
Step 3 : आता तुम्हाला येथे Subject टाईप करायचा आहे. त्यासाठी आपल्या Tech Marathi टेलिग्राम चॅनेल वर जा आणि तेथे दिलेला subject कॉपी करून g-mail मध्ये हे जसेच्या तसे पेस्ट करा. मित्रांनो यामध्ये तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर एडिट करून टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकत असताना त्यामध्ये +91 आणि नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि खाली युअर नेम आहे ते देखील कट करायचं आहे आणि तेथे तुमचे नाव टाकायचे आहे.
Step 4 : आणि ही सर्व प्रोसेस करून झाल्यानंतर उजव्या बाजूला Send म्हणून ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचे आहे. आणि हा ईमेल सेंड होऊन जाईल.
टेलिग्राम चॅनल लिंक : येथे क्लिक करा
मित्रांनो जास्तीत – जास्त 24 तासात तसं तर मित्रांनो लगेच 15 ते 20 मिनिटात तुम्हाला रिप्लाय येतो. परंतु 24 तासाच्या आता तुम्हाला एक रिप्लाय येईल आणि त्यामध्ये लिहिलेले असेल की तुमचे व्हाट्सअँप सुरु करण्यात आलेले आहे आणि तुम्ही ते युज करू शकता. पण मित्रांनो मेल आल्याशिवाय तुम्हाला अजिबात व्हाट्सअँप उघडून पाहायचं सुद्धा नाहीये. मेल आल्यावरच तुम्ही व्हाट्सअँप ओपन करायचे आहे.
आणि मित्रांनो जर मेल नाहीच आला तर युट्युबवर जा Tech Marathi सर्च करा आणि तेथे याबद्दलचा डिटेल व्हिडीओ बनवलेला आहे.