मित्रांनो जेव्हा बटणाचे फोन होते, तेव्हा ते वापरणे खूपच सोप्पे होते. म्हणजेच सिमकार्ड टाकले की फोन चालू. त्यामध्ये कॉलिंग शिवाय दुसरे कोणतेही फिचर्स मिळत नव्हते. परंतु आता अँड्रॉइड स्मार्टफोन आले आहे. अशातच जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी एखादा नवीन स्मार्टफोन खरेदी करता तेव्हा तो सेट करणं खूपच अवघड होऊन जातं. हे स्मार्टफोन सेट करणं खूपच अवघड असतं. त्याबद्दल आपल्याला परिपूर्ण नॉलेज सुद्धा नसते. पण काळजी करू नका तुम्ही टेक मराठीला फॉलो केलंय तर खास तुमच्यासाठी आम्ही नवीन अँड्रॉइड फोन कसा सेट करावा याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत, ती माहिती आपण पुढे पाहुयात… मित्रांनो ही माहिती खास नवीन स्मार्टफोन युजर्ससाठी आहे परंतु तुम्ही स्मार्टफोन खूप दिवसापासून वापरत असाल तरीसुद्धा हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल.
- नवीन फोन सेट कसा करायचा?
नवीन अँड्रॉइड फोन सेट करण्यासाठी तुम्हाला पुढील 3 स्टेप्स कराव्या लागतात. त्यामध्ये पहिली स्टेप आहे ती म्हणजे बेसिक सेटअप. दुसरी इंटरनेट सेटअप आणि तिसरी स्टेप आहे ती ईमेल सेटअप. सर्वात अगोदर बेसिक सेटअप पाहुया..
- BASIC SETUP
जेव्हा तुम्ही नवीन फोन घेता तेव्हा तुम्हाला त्या स्मार्टफोन सोबत चार्जर, केबल, आणि एक छोटीशी पिन मिळते. जिला सिम इजेक्टर टूल असे सुद्धा म्हणतात. आणि त्यासोबतच काही डॉक्युमेंट्स मिळतात.
- Step 1 : सर्वात अगोदर बॉक्समध्ये असलेल्या सिम इजेक्टर टूलच्या मदतीने सिम ट्रे उघडा. सिम ट्रे फोनच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला दिलेला असेल.
- Step 2 : सिम ट्रे जवळच एक छोटासे होल असेल, त्यामध्ये बॉक्समध्ये असलेली पिन प्रेस करा त्यानंतर सिम ट्रे बाहेर येईल.
- Step 3 : सिम ट्रे मध्ये सिम टाकण्यासाठी जागा दिलेली असेल त्यामध्ये सिम टाका आणि बंद करून घ्या. त्यानंतर फोन ऑन करा.
- Internet Setup
फोन ऑन झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये डाटा म्हणजेच इंटरनेटचा सेटअप करायचा आहे. हवं तर तुम्ही इंटरनेट शिवाय सुद्धा तुम्ही फोन चालवू शकता परंतु त्यात काहीही एक मजा नाही. जेव्हा फोन ऑन होईल तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला भाषा सेट करायचे ऑप्शन दिसेल. त्यामध्ये तुमची भाषा सेट करून घ्यायची आहे.
- Step 1 : मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला स्टार्टचे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भाषा सेट करायचं ऑप्शन मिळेल त्यामध्ये तुम्हाला तुमची भाषा सेट करायची आहे.
- Step 2 : त्यानंतर काही लिहून आलेले दिसेल तेथे तुम्हाला त्याला Accept करायचं आहे, आणि पुढे जायचे आहे.
- Step 3 : त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्हाला तुमच्या जुन्या मोबाईल मधून डाटा कॉपी करायचा आहे की नाही. यामध्ये जर तुम्ही आधीपासूनच एक अँड्रॉइड युजर असाल तर डाटा ट्रान्सफर करू शकता. जर तुम्ही पहिल्यादाच स्मार्टफोन वापरत असेल तर खाली दिलेल्या नाही ( NO) वरती केली करा आणि पुढे जा.
- Step 4 : त्यानंतर तुम्हाला वायफाय सेट करण्याचे ऑप्शन दिसेल. जर तुमच्याकडे वायफाय असेल तर तुम्ही या पर्यायावरती क्लिक करून वायफाय सेट करू शकता.
- Step 5 : जर तुमच्या कडे वायफाय नसेलच तर पुढे जा या पर्यायावर्ती क्लिक करा. त्यानंतर आपो-आपच तुमचा फोन मोबाईल डाटावरती सेट होईल.
- ईमेल आयडी सेटअप
या संपूर्ण स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही ईमेल आयडी सेटअप करू शकता. जर तुम्ही अँड्रॉइड फोन सेट करत आहात तर त्यामध्ये गुगल आयडी सेट करणे खूप आवश्यक आहे. कारण ई-मेल आयडी सेट केल्यानंतरच तुम्हाला स्मार्ट फिचर्स जसे की अँप, ई-मेल, गेम आणि इतर अनेक फिचर्स तुम्हाला मिळतील.
- Step 1 : जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तुम्हाला गुगल खात्यात साइन इन करण्याचे ऑप्शन मिळेल. अशातच जर तुमच्यकडे आधीपासूनच अकाउंट असेल तर त्यामध्ये टाकून पासवर्ड टाका आणि साइन इन करा आणि फोन सेट होईल. परंतु जर आधीपासूनच तुमच्याकडे अकाऊंट नसेल तर खाली दिलेल्या खाते तयार करा या ऑप्शनवर क्लिक करा
- Step 2 : येथे तुम्हाला तुमच्या नावावरून खाते बनवण्याचे ऑप्शन मिळते किंवा तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर वरून सुद्धा गुगल खाते बनवू शकता.
- Step 3 : नवीन अकाउंट बनवताना तुम्हाला यामध्ये तुमचे नाव, आडनाव, जन्मतारीख, लिंग सिलेक्ट करावा लागेल. मोबाईल नंबर टाका त्यानंतर एक OTP येईल.
- Step 4 : त्यानंतर एक स्ट्रॉंग पासवर्ड त्या ईमेलला तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजेच तुमच्या अकाउंटला काहीच अडचण येणार नाही
- त्यानंतर तुमचे फोटोस, नंबर आणि काही महत्वाच्या गोष्टी त्यावरती अपलोड करायच्या आहे. जेणेकरून तुम्ही परत एखादा नवीन मोबाईल खरेदी केला तर ह्या ईमेलवर असलेले सर्व फोटोज नंबर आणि ईमेल वर असलेल्या सर्व गोष्टी तो ईमेल टाकल्यानंतर त्या नवीन मोबाईलमध्ये सेट होऊन जाईल.
मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर ट्रिक्स साठी आपल्या टेक मराठी पेजला फॉलो नक्की करा..
धन्यवाद..