• सायबर फसवणूकीची तक्रार ऑनलाइन कशी दाखल करावी ते जाणून घ्या:
सायबर फसवणूक किंवा ऑनलाइन घोटाळ्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. लोक फसवणूक करण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. कधी यूट्यूब व्हिडीओ लाइक करून पैसे देऊन तर कधी डेटिंगच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. म्हणूनच ऑनलाईन पेमेंट आणि सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक करायला हवा. तुमची छोटीशी चूक तुम्हाला गरीब बनवू शकते.
फसवणूक झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात हे बहुतेक लोकांना माहीत नसते. जर तुमच्यासोबत सायबर फ्रॉड होत असेल तर रडून दुःखी होण्यापेक्षा हे काम करा, तुमची समस्या दूर होईल. सरकारने सायबर फ्रॉडचा सामना करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे, पुढे दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही सायबर क्राईमशी संबंधित घटनांबद्दल तक्रार करू शकता.
• कशी करावी Cyber Fraud संबंधित कंप्लेंट
तुमचीही ऑनलाइन फसवणूक होत असेल, तर लगेच १५५२६० वर कॉल करा. या क्रमांकावर कॉल केल्यानंतर तुमचे हरवलेले पैसे मिळणे सोपे होईल आणि सायबर ठगांवर कारवाई सुरू केली जाईल. हा हेल्पलाइन क्रमांक एकप्रकारे आभासी पोलिस ठाण्याप्रमाणे काम करतो. जेव्हा तुम्ही या नंबरवर कॉल करता तेव्हा तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीशी संबंधित सर्व माहिती द्या.
तक्रार प्राप्त होताच फसवणूक करणाऱ्याचे बँक खाते गोठवले जाईल. बँक खाते गोठवण्याचा अर्थ असा आहे की तो त्यातून पैसे काढू शकणार नाही किंवा जमा करू शकणार नाही. हे करण्यासाठी, प्रथम तुम्हाला वर दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करावी लागेल. असे केल्याने तुम्हाला तुमचे पैसेही परत मिळण्याची दाट शक्यता आहे.